Video : IND A vs PAK A : वर्ल्डकप आधी टीम इंडियाला मिळाला दुसरा रैना, एकदा हा खतरनाक कॅच पाहाच

महाराष्ट्राचा सुपूत्र राजवर्धन हंगरगेकर याने 5 विकेट घेत संघाच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यामध्ये एका खेळाडूने एकदम  झकास झेल घेतला. टीम इंडियाचा भविष्यातील माजी खेळाडू सुरेश रैनासारखा चपळ फिल्डर त्याच्यामध्ये दिसत असल्याचं अनेक क्रिकेट चाहत्यांनी म्हटलं आहे.

Video : IND A vs PAK A : वर्ल्डकप आधी टीम इंडियाला मिळाला दुसरा रैना, एकदा हा खतरनाक कॅच पाहाच
| Updated on: Jul 19, 2023 | 11:05 PM

मुंबई  : एमर्जिंग आशिया कपमध्ये टीम इंडिया A आणि पाकिस्तान A यांच्यात साखळी सामना (IND A vs PAK A Match) पार पडला. या सामन्यामध्ये पाकिस्तान संघाचा भारतीय संघाने विजय मिळवला आहे. पाकिस्तान प्रथम फलंदाजी कतताना 48 ओव्हरमध्ये 205 धावांचं आव्हान ठेवलं होतं. टीम इंडियाचा सलामीवीर साई सुदर्शनची नाबाद शतकी खेळी आणि निकिन जोसच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर हा सामना 8 विकेटसे जिंकला. महाराष्ट्राचा सुपूत्र राजवर्धन हंगरगेकर याने 5 विकेट घेत संघाच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यामध्ये हर्षित राणा या खेळाडूने एकदम  झकास झेल घेतला.

राजवर्धन हंगरगेकर याच्या गोलंदाजीवेळी शॉर्ट थर्ड मॅनला उभ्या असलेल्या हर्षित राणाने हवेत उंच उडी मारत कडक कॅच घेतला. कॅच पकडल्यावर तो खाली पडला पण त्याने चेंडू खाली पडू दिला नाही. पाकिस्तानकडून आठव्या क्रमांकावर उतरलेल्या कासिम अक्रम याचा तो कॅच होता. एकट्या कासिमनेच पाकिस्तान संघाकडून सर्वाधिक 48 धावा केल्या होत्या. हर्षित राणाने कमाल कॅच घेत त्याला माघारी पाठवलं.

पाहा व्हिडीओ -:

 

दरम्यान, हर्षित राणाने घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. त्यासोबतच टीम इंडियाचा भविष्यातील माजी खेळाडू सुरेश रैनासारखा चपळ फिल्डर त्याच्यामध्ये दिसत असल्याचं अनेक क्रिकेट चाहत्यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तान ए प्लेईंग इलेव्हन | मोहम्मद हरीस (कॅप्टन आणि विकेटकीपर), सॅम अयुब, हसीबुल्ला खान, कामरान गुलाम, साहिबजादा फरहान, ओमेर युसूफ, कासिम अक्रम, मुबासिर खान, मेहरान मुमताज, मोहम्मद वसीम जूनियर आणि शाहनवाज दहनी.

टीम इंडिया ए प्लेईंग इलेव्हन | यश धुल (कर्णधार), साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, रियान पराग, निशांत सिंधू, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, हर्षित राणा, नितीश रेड्डी आणि राजवर्धन हंगरगेकर.