
आयसीसी चॅम्पिन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. एका ट्रॉफीसाठी 8 संघात एकूण 19 दिवस 15 सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागलं गेलं आहे. यजमान पाकिस्तान, टीम इंडिया, बांगलादेश आणि न्यूझीलंड हे 4 संघ ए ग्रुपमध्ये आहेत. तर अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे 4 संघ बी ग्रुपमध्ये आहेत. आतापर्यंत एकूण 3 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यानुसार न्यूझीलंड, टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका या तिन्ही संघांनी स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. तर यजमान पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तिन्ही आशियाई संघांना स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पराभवाची चव चाखावी लागली आहे. आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे या स्पर्धेतील सर्वात मोठ्या सामन्याकडे लागून आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 23 फेब्रुवारीला महामुकाबला खेळवण्यात येणार आहे. गतविजेता विरुद्ध उपविजेता असा हा सामना असणार आहे. चॅम्पिटन्स ट्रॉफीचं...