AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑस्ट्रेलियाचा फक्त 183 चेंडूत पराभव, वैभव सूर्यवंशीची आक्रमक खेळी

भारत आणि ऑस्ट्रेलिया अंडर 19 संघात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. भारताने हा सामना 7 गडी राखून आपल्या नावावर केला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना झोडून काढलं.

ऑस्ट्रेलियाचा फक्त 183 चेंडूत पराभव, वैभव सूर्यवंशीची आक्रमक खेळी
ऑस्ट्रेलियाचा फक्त 183 चेंडूत पराभव, वैभव सूर्यवंशीची आक्रमक खेळीImage Credit source: MB Media/Getty Images
| Updated on: Sep 21, 2025 | 4:30 PM
Share

भारताचा अंडर 19 संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला दणका दिला आणि 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 225 धावांवर रोखलं. भारताच्या भेदक गोलंदाजीचा सामना करताना ऑस्ट्रेलियाला फटकेबाजी करण्यात फार काही यश आलं नाही. ऑस्ट्रेलियाकडून जॉन जेम्सने सर्वाधिक 77 धावा केल्या तर टॉम होगने 41 आणि स्टीवर होगनने 39 धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना भारताकडून काही खेळाडूंनी चांगली फटकेबाजी केली. यात एक नाव आहे वैभव सूर्यवंशीचं.. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. यात 38 धावांचं योगदान एकट्या वैभव सूर्यवंशींचं होतं.

वैभव सूर्यवंशीने 22 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकार मारत 38 धावा केल्या. त्याने 172.73 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. त्यानंतर वेदांत त्रिवेदी आणि अभिज्ञान कुंडू यांनी विजयी भागीदारी केली. वेदांतने 69 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या. यात त्याने 8 चौकार मारले. तर कुंडूने 74 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने नाबाद 87 धावांची खेळी केली. या तिघांच्या आक्रमक खेळीमुळे भारताने विजयी आव्हान फक्त 30.3 षटकात पूर्ण केलं.

दुसरीकडे, भारताकडून हेनिल पटेलने चांगली गोलंदाजी केली. त्याने 10 षटकात फक्त 38 धावा देत 3 गडी बाद केले. तर किशन कुमारने आणि कनिष्क चौहानने प्रत्येकी 2 विकेट मिळवल्या. यासह आरएस अंबरिशने 1 विकेट घेतली.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, नमन पुष्पक, हेनिल पटेल, किशन कुमार.

ऑस्ट्रेलिया अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): सायमन बज (विकेटकीपर), अ‍ॅलेक्स टर्नर, स्टीव्हन होगन, विल मलाज्झुक (कर्णधार), यश देशमुख, हेडन शिलर, टॉम होगन, आर्यन शर्मा, जॉन जेम्स, बेन गॉर्डन, चार्ल्स लॅचमुंड.

Follow Us
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन