AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन होणार 12वा खेळाडू! जाणून घ्या 11 खेळाडूंची नावं

India vs Pakistan, Super 4 Match : भारत पाकिस्तान सामन्याला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. या सामन्यात प्लेइंग 11 तशीच असेल की बदल याबाबत खलबतं सुरु आहेत. दुसरीकडे, संजू सॅमसन हा 12वा खेळाडू ठरू शकतो. का ते जाणून घ्या.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन होणार 12वा खेळाडू! जाणून घ्या 11 खेळाडूंची नावं
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन होणार 12वा खेळाडू! जाणून घ्या 11 खेळाडूंची नावंImage Credit source: PTI
| Updated on: Sep 21, 2025 | 2:56 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीतील दुसरा सामना भारत आणि पाकिस्तान या संघात होत आहे. अंतिम फेरीसाठी दोन्ही संघांना विजय खूपच महत्त्वाचा आहे. कारण पुढे जाऊन गणित आणखी किचकट होऊ शकतं. त्यामुळे या सामन्यात कोणतीही उणीव राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे. यासाठी भक्कम प्लेइंग 11 वर भर असणार आहे. साखळी फेरीत ओमानविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसनने अर्धशतकी खेळी केली होती. या सामन्यात हिरो ठरलेला संजू सॅमसन 12वा खेळाडू होऊ शकतो. तुम्ही वाचलं ते अगदी बरोबर आहे. पण भारताच्या प्लेइंग 11 बाबत नाही. कारण संजू सॅमसन प्लेइंग 11 चा भाग असेल यात काही शंका नाही. 12 वा खेळाडू म्हणजेच टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1 हजाराहून अधिक धावा करण्याऱ्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे. आतापर्यंत या यादीत 11 खेळाडू आहे. आता संजू सॅमसन या यादीत बसणारा 12वा खेळाडू ठरणार आहे.

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्माचं नाव आघाडीवर आहे. त्याने 4231 धावा केल्या आहेत. त्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर विराट कोहली असून त्याने 4188 धावा केल्या आहेत. आता या दोन्ही खेळाडूंनी टी20 क्रिकेटला रामराम ठोकला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांवर असून त्याने 2652 धावा केल्या आहेत. केएल राहुलने 2265 धावा, हार्दिक पांड्याने 1813, शिखर धवनने 1759, एमएस धोनीने 1617, सुरेश रैनाने 1605 धावा, ऋषभ पंतने 1209 धावा, युवराज सिंगने 1177 धावा, तर श्रेयस अय्यरने 1104 धावा केल्या आहे.

संजू सॅमसन या यादीत सहभागी होणारा 12 खेळाडू असणार आहे. यासाठी त्याला 83 धावांची गरज आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने 83 धावा केल्या तर तो या यादीत सहभागी होईल. संजू सॅमसनने आतापर्यंत 45 टी20 सामने खेळले असून 39 डावात 917 धावा केल्या आहेत. त्यामुळे संजू सॅमसनकडे 1 हजार धावा पूर्ण करण्याची मोठी संधी आहे. पण शक्य झालं नाही तर आशिया कप स्पर्धेत तशी संधी आहे. कारण सुपर 4 फेरीत भारतीय संघ एकूण 3 सामने खेळणार आहे. त्यानंतर अंतिम फेरीत स्थान पक्कं झालं तर आणखी एक सामना वाटेला येईल.

महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.