ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावताच कर्णधार हरमनप्रीत कौर वैतागली, मनातला राग काढला बाहेर
ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने 1-2 ने गमावली. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतासमोर 412 धावांचं मोठं आव्हान होतं. तरीही भारताने झुंज देण्याचा प्रयत्न केला आणि 43 धावा तोकड्या पडल्या. या पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने संताप व्यक्त केला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात धावांचा डोंगर उभा केला. या धावा गाठणं भारताला काही शक्य होणार नाही हे आधीच कळलं होतं. पण भारतीय संघाने त्यातल्या त्यात चांगली झुंज दिली. ऑस्ट्रेलियाने 47.5 षटकात सर्व गडी गमवून 412 धावा केल्या आणि विजयासाठी 413 धावा दिल्या. पण भारताने या सामन्यात 47 षटकात सर्व गडी गमवून 369 धावा केल्या. भारताने हा सामना 43 धावांनी गमावला. या पराभवामुळे भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 1-2 ने गमावली. या पराभवानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने संताप व्यक्त केला.
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, ‘पराभूत संघात असणे मला आवडत नाही. पण संपूर्ण मालिकेत आम्ही चांगले क्रिकेट खेळलो. आमच्यासाठी खूप काही शिकण्यासारखे आहे. दीप्ती आणि स्नेहने ज्या पद्धतीने फलंदाजी केली. अगदी शेवटच्या सामन्यातही स्नेहने अशी फलंदाजी केली आणि त्यावरून आमच्या फलंदाजीत खोली आहे आणि आम्ही आमचे शॉट्स खेळू शकतो हे दिसून येते. क्षेत्ररक्षण ही अशी गोष्ट आहे जी आम्ही खरोखर कठोर परिश्रम करत आहोत. दुर्दैवाने आम्ही अजूनही त्या संधी गमावत आहोत.’
हरमनप्रीत कौर पुढे म्हणाली की, ‘बरेच सकारात्मक धडे आहेत. तुम्ही नेहमीच मला आमच्या योजनाबद्दल विचारत आहात. चांगली गोष्ट म्हणजे आमच्याकडे आता बरेच खेळाडू आहेत आणि आम्ही बरेच संयोजन वापरून पाहू शकतो. विश्वचषक हा एक लांब स्पर्धा आहे आणि ते त्या विशिष्ट दिवसासाठी कोण सर्वोत्तम आहे याबद्दल आहे. एक चांगली मालिका होती. आम्ही त्यांना एक कठीण झुंज दिली.’
मालिकावीराचा पुरस्कार स्मृती मंधानाला मिळाला. या मालिकेत तिने सलग दोन शतक ठोकली. तसेच पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. झुंजार खेळीबाबत सांगताना स्मृती मंधाना म्हणाली की, ‘ फक्त एकच गोष्ट म्हणजे काहीही विचार करू नका, फक्त चेंडूवर प्रतिक्रिया द्या. आम्हाला माहित होते की खेळपट्टी चांगली आहे आणि आउटफील्ड वेगवान आहे आणि आम्हाला आमच्या शॉट्सचे मूल्य मिळेल. 400 धावांचा पाठलाग करताना तुमच्याकडे पर्याय नसतो, त्या ब्रँडचे क्रिकेट खेळावे लागते. महिला क्रिकेटसाठी हा एक चांगला खेळ होता.’
