Asia Cup 2025 : अभिषेक शर्मा- शुबमन गिलसह टीम इंडियाच्या 11 खेळाडूंवर 11 संकटं, सांभाळून नाही तर…
आशिया कप स्पर्धा 2025 स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडिया जेतेपदासाठी दावेदार मानली जात आहे. पण हलक्यात घेऊन चालणार नाही. कारण 11 संकटं टीम इंडियाच्या डोक्यावर घिरट्या घालत आहेत.

आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारताचा या स्पर्धेतील पहिला सामना 10 सप्टेंबरला युएईविरुद्ध होणार आहे. त्यानंतर पाकिस्तान आणि ओमानविरुद्ध सामना होईल. या तिन्ही सामन्यात टीम इंडिया विजयासाठी दावेदार मानली जात आहे. पण हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. कारण आक्रमक फलंदाजी रोखणारी 11 डाव या स्पर्धेत आहेत. त्यामुळे भारतीय फलंदाजांना सावध खेळी करावी लागणार आहे. या स्पर्धेतील खेळपट्टीचा अंदाज पाहता फिरकीपटूंचा दबदबा असणार आहे. त्यात 11 फिरकीपटू भारतीय फलंदाजांना रोखण्याची ताकद ठेवतात. मग अभिषेक शर्मा असो की आणखी कोणी? जर चुकलात तर थेट तंबूत परतावं लागेल. त्यामुळे सावध होत फलंदाजी करणं भाग आहे.
आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाला सर्वात मोठा धोका हा अफगाणिस्तानकडून आहे. राशिद खान सध्या फॉर्मात नाही. पण कधीही उलटफेर करू शकतो. त्याने ट्राय सीरिजमध्ये 4 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. तर नूर अहमद देखील अडचणीत आणू शकतो. त्याने 36 सामन्यात पाच विकेट घेतल्या आहेत. मोहम्मद नबी हा अनुभवी फिरकी गोलंदाज असून टीम इंडियाला खूप त्रास देताना दिसला आहे. मोहम्मद नबीने तिरंगी मालिकेत चार सामन्यांमध्ये चार विकेट्स घेतल्या आहेत. मोहम्मद अल्लाह गझनफर हा अफगाणिस्तानचा गूढ फिरकी गोलंदाज आहे.
भारताचा साखळी फेरीतील दुसरा सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यात मोहम्मद नवाज हा भारतासाठी आव्हान असणार आहे. तो जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने ट्राय सीरिजच्या अंतिम सामन्यात अफगाणिस्तानची दाणादाण उडवून दिली. त्याने 5 सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. पाकिस्तानचा मिस्ट्री फिरकीपटू अबरार हा देखील डोकेदुखी ठरू शकतो. त्याने दोन सामन्यात 6 विकेट घेतल्या आहेत. सुफियान मुकीम हा पहिल्यांदाच भारताविरुद्ध खेळू शकतो. तिरंगी मालिकेत चार सामन्यांमध्ये चार बळी घेतले आहेत.
युएईचा डावखुरा फिरकी गोलंदाज हैदर अली टीम इंडियासाठी त्रासदायक शकतो. त्याने तिरंगी मालिकेत चार सामन्यांमध्ये 6 विकेट घेतल्या आहेत. श्रीलंकेचे लेग स्पिनर वनेंदू हसरंगा, वेलालागे आणि महिष थीकशन यांचा समावेश आहे. त्यांनी यापूर्वी भारतीय फलंदाजांना अडचणीत आणलं आहे.
