Legends League: सचिन, रैना, युवराज दिग्गज फेल पण तरीही जिंकले ‘इंडियावाले’, फायनलमध्ये असा मिळवला विजय

Legends League: RSWS च्या फायनलमध्ये श्रीलंका लिजेंडसवर विजय, टॉप प्लेयर फ्लॉप मग खेळलं कोण?

Legends League: सचिन, रैना, युवराज दिग्गज फेल पण तरीही जिंकले इंडियावाले, फायनलमध्ये असा मिळवला विजय
india legends
Image Credit source: Twitter
| Updated on: Oct 02, 2022 | 10:51 AM

मुंबई: सचिन तेंडुलकर, (Sachin Tendulkar) सुरेश रैना आणि युवराज सिंह हे दिग्गज फलंदाज RSWS च्या फायनलमध्ये फ्लॉप ठरले. पण तरीही इंडिया लिजेंडसने विजय मिळवला. फायनलमध्ये इंडिया लिजेंडसने (India Legends) श्रीलंका लिजेंडसचा 33 धावांनी पराभव केला. या मॅचमध्ये सचिन, रैना आणि युवराज तिन्ही दिग्गज फ्लॉप ठरले. तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे तीन दिग्गज चालले नाहीत. मग खेळलं कोण? त्याचं नाव आहे नमन ओझा.

नमन ओझाची स्पेशल खेळी

नमन ओझाने जणू आपली सर्वोत्तम खेळी फायनलसाठी राखून ठेवली होती. त्याने फायनलमध्ये शतक झळकवून टीमच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. हा रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा दुसरा सीजन आहे. इंडिया लिजेंडसची टीम सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनली आहे.

नमन ओझाने किती धावा केल्या?

फायनल मॅचमध्ये इंडिया लिजेंडसने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 195 धावा केल्या. मोठे फलंदाज अपयशी ठरले. इंडिया लिजेंडसला मोठी धावसंख्या उभारुन देण्यात विकेटकीपर फलंदाज नमन ओझाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 71 चेंडूत नाबाद 108 धावा फटकावल्या.

152.11 च्या स्ट्राइक रेटने खेळलेल्य़ा या इनिंगमध्ये 15 चौकार आणि 2 षटकार लगावले. नमननंतर विनय कुमार दुसरा टॉप स्कोरर आहे. त्याने 21 चेंडूत 36 धावा फटकावल्या.

सचिनने खातही उघडलं नाही

सचिन तेंडुलकर या मॅचमध्ये खातही उघडू शकला नाही. सुरेश रैनाने फक्त 4 धावा केल्या. युवराज सिंहने सुद्धा केवळ 19 धावा केल्या. नमन ओझाच्या शतकामुळे या दिग्गजांच अपयश झाकलं गेलं.

किती ओव्हर्समध्ये ऑलआऊट झाली श्रीलंका लिजेंडसची टीम
श्रीलंका लिजेंडसची टीम पूर्ण 20 ओव्हर्सही खेळू शकली नाही. 196 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांचा डाव 18.5 ओव्हर्समध्ये आटोपला. 162 धावांवर संपूर्ण टीम ऑलआऊट झाली. इंडिया लिजेंडसने 33 धावांनी सामना जिंकला. भारताकडून विनय कुमार यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 3 विकेट घेतले.