AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पारू’ मालिका अचानक का बंद? शरयू सोनावणेनं सोडलं मौन, म्हणाली “TRP चांगला असूनही पूर्वकल्पना न देता..”

झी मराठी वाहिनीवरील सर्वांत लोकप्रिय मालिका 'पारू'ने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतला. याबाबत अभिनेत्री शरयू सोनावणे हिनं सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. शरयू या व्हिडीओमध्ये काय म्हणाली, ते सविस्तर वाचा..

'पारू' मालिका अचानक का बंद? शरयू सोनावणेनं सोडलं मौन, म्हणाली TRP चांगला असूनही पूर्वकल्पना न देता..
शरयू सोनावणेImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 18, 2026 | 10:09 AM
Share

प्रसाद जवादे आणि शरयू सोनावणे यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘पारू’ ही मालिका अचानक बंद झाली. फेब्रुवारी महिन्यात या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित झाला होता. तेव्हा कोणालाच कल्पना नव्हती की, ही मालिका बंद होत आहे. आता या मालिकेत पारूची मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री शरयू सोनावणे हिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. सतत दोन वर्षे टीआरपी चांगला असूनही ही मालिका अचानक का बंद केली, हे सर्व अनपेक्षित आणि धक्कादायक होतं, अशा शब्दांत शरयू व्यक्त झाली.

काय म्हणाली शरयू?

“नमस्कार, मी शरयू सोनावणे.. म्हणजे तुमच्या सगळ्यांची लाडकी पारू. बरीच प्रतीक्षा केल्यानंतर अखेर मी माझ्या प्रेक्षकांसाठी हा व्हिडीओ करतेय. कारणच तसं आहे. गेल्या काही दिवसांपासून मला बरेच मेसेज आणि फोन कॉल्स येत आहेत. पारू ही मालिका अचानक का बंद झाली, असा प्रश्न मला विचारला जात आहे. मी तुम्हा सर्वांना हे सांगू इच्छिते की, 10 फेब्रुवारी 2026 रोजी ‘पारू’ या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित करण्यात आला होता. तुमच्या प्रेमामुळेच, पाठिंब्यामुळेच आम्ही इतक्या लांबचा पल्ला गाठू शकलो. सतत दोन वर्ष टीआरपी चांगला असूनही ही मालिका अचानक बंद होणं ही सर्वांसाठीच अनपेक्षित गोष्ट आहे आणि अर्थातच धक्कादायक गोष्ट आहे,” असं ती म्हणाली.

याविषयी तिने पुढे सांगितलं, “आमची ‘पारू’ ही मालिका अचानक बंद होतेय, याबद्दल निर्मात्यांनी आम्हाला कोणतीच पूर्वकल्पना दिली नव्हती. आजवर मराठी टीव्ही इंडस्ट्रीत असा कुठल्याही मालिकेचा शेवट झाला नाही, जसा पारू या मालिकेचा झाला. मी तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागते. कारण या मालिकेचा शेवटचा भागही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो नाही. काही तांत्रिक अडचणी आणि प्रॉडक्शनच्या समस्येमुळे हा शेवटचा भाग प्रसारित झाला नाही. आता पारू ही मालिका बंद होत असली तरी आपल्यातलं नातं, तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम हे कायम माझ्यासोबत असेल. पारूच्या सुखादु:खात तुम्ही माझ्यासोबत होतात, यासाठी मी कायम तुमची ऋणी असेन.”

“आता लवकरच एका नव्या रुपात, नव्या भूमिकेत भेटुयात. तोपर्यंत तुमचा आशीर्वाद आणि माझ्यावर असलेलं प्रेम कायम राहुद्या. मी तुमची मनापासून माफी मागते, तुमचीच पारू,” असं म्हणत शरयूने या व्हिडीओचा शेवट केला.

Follow Us
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त