AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणमध्ये हाहाकार! इस्त्रायलची भयंकर धमकी, थेट म्हटले, मोतजबा खामेनेई

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले असून एकही देश माघार घेत नाही. तणाव अधिक वाढताना दिसत आहे. त्यामध्येच इस्त्रायल जास्त आक्रमक होताना दिसत आहे. इस्त्रायलकडून अत्यंत मोठी धमकी इराणला देण्यात आली. ज्यामुळे युद्ध अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

इराणमध्ये हाहाकार! इस्त्रायलची भयंकर धमकी, थेट म्हटले, मोतजबा खामेनेई
Mojtaba Khamenei
| Updated on: Mar 18, 2026 | 9:55 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग संकटात आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणवर हल्ला केला, त्यावेळी कोणालाही वाटले नव्हते की, या युद्धाचा थेट आपल्यालाही फटका बसेल. आता हे युद्ध आपल्या घरापर्यंत आले असून एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. युद्ध लवकरात लवकर थांबवावे, अशी मागणी केली जात आहे. आखाती देश या युद्धामुळे संकटात आहेत. थेट दुबई विमानतळाला टार्गेट करून मोठे हल्ले करण्यात आली. जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढत आहेत. इराणकडून स्पष्ट करण्यात आले की, तेलाच्या प्रति बॅरलची किमत 200 डॉलरच्या पुढे जाणार. जागतिक बाजारात तेलाच्या किमती स्थिर ठेवण्याकरिता रशियाकडून तेल खरेदी करण्याचे आवाहन अमेरिकेकडून करण्यात आले. अगोदरच त्याच रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर टॅरिफ अमेरिका लादत होती. इराणकडून होर्मुज मार्ग बंद करण्यात आल्याने अनेक देशात गॅस आणि तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला.

होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आल्याने अमेरिकेने मास्टर प्लॅन तयार करत अनेक देशांना आपल्या युद्धनाैका होर्मुज खाडीत आणण्यास सांगितल्या. होर्मुज मार्ग सुरक्षित करण्याचे अमेरिकेने ठरवले. मात्र, एकही देश अमेरिकेच्या मदतीला पुढे आला नाही. तिथेच डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला. एकही देश अमेरिकेच्या मदतीला पुढे आला नाही.

इराण कोणत्याही परिस्थितीमध्ये या युद्धात हार मानत नसल्याचे लक्षात आल्यानंतर इस्त्रायल अधिक आक्रमक होताना दिसत आहे. त्यामध्येच इस्त्रायलकडून अत्यंत मोठी धमकी देण्यात आली. इस्त्रायलकडून सांगण्यात आले की, इराणचे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांना शोधून ठार करू. या धमकीने मोठी खळबळ उडाली. आयातुल्ला खामेनेई यांना हल्ल्यात ठार केल्यानंतर त्यांचा मुलगा मोजतबा खामेनेई याने इराणचे सर्वाेच्च नेतेपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.

मोजतबा खामेनेई यांच्या तब्येतीबद्दल विविध चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. हेच नाही तर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात मोजतबा खामेनेई गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जाते. हेच नाही तर मध्यंतरी चर्चा होती की, मोजतबा खामेनेई इराणमध्ये नसून त्यांच्यावर रशियामध्ये उपचार सुरू आहेत. त्यामध्येच आता इराणकडून मोजतबा खामेनेई यांना शोधून ठार करू अशी थेट धमकी देण्यात आली.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...