IND vs SA: कॅप्टन KL Rahul बाहेर गेल्यामुळे पुण्याच्या मुलाचा होणार फायदा

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) गुरुवारपासून 5 T 20 सामन्यांची मालिका सुरु होत आहे. आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पहिला सामना होईल.

IND vs SA: कॅप्टन KL Rahul बाहेर गेल्यामुळे पुण्याच्या मुलाचा होणार फायदा
केएल राहूल
Image Credit source: social
| Updated on: Jun 09, 2022 | 11:49 AM

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) गुरुवारपासून 5 T 20 सामन्यांची मालिका सुरु होत आहे. आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पहिला सामना होईल. मात्र त्याआधी टीम इंडियाने कॅप्टन के.एल.राहुलला (KL Rahul) गमावलय. दुखापतीमुळे तो या संपूर्ण मालिकेत खेळू शकणार नाहीय. त्याच्याजागी ऋषभ पंत (Rishabh Pant) कॅप्टन बनला आहे. ऋषभ पंत पहिल्यांदा टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून मैदानावर उतरणार आहे. राहुल बाहेर गेल्यामुळे टीम इंडियाचं प्लेइंग 11 चं समीकरणही बदलणार आहे. राहुल फक्त कॅप्टनच नाहीय, तर चांगला सलामीवीरही आहे. आता टीम इंडियाला नवीन जोडी मैदानात उतरवावी लागणार आहे. केएल राहुलच्या दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाडला फायदा होणार आहे.

त्याला पूर्ण सीरीजमध्ये संधी मिळेल

केएल राहुलची दुखापत ऋतुराज गायकवाडच्या पथ्यावर पडणार आहे. यामुळे त्याला मालिकेत पूर्ण संधी मिळेल. ऋतुराज भारताकडून आतापर्यंत फक्त 3 T 20 सामने खेळला आहे. प्रति मॅच त्याची सरासरी फक्त 13 धावा आहे. जानेवारीत भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. तेव्हापासून ऋतुराज गायकवाडच्या नावाची चर्चा होती. त्याला संधी मिळत नव्हती. दुखापतीमुळे सुद्धा त्याची संधी हुकली. या सीरीजमध्येही त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी होती. कारण केएल राहुल आणि इशान किशन या दोघांची जोडी सलामीला उतरणार होती. अशावेळी दुसरा ओपनर ऋतुराजला संधी कशी मिळणार? हा प्रश्न होता. पण आता राहुलची दुखापत ऋतुराज गायकवाडच्या पथ्यावर पडणार आहे.

ऋतुराज गायकवाडचं टी 20 मध्ये प्रदर्शन

ऋतुराज गायकवाडची टी 20 मध्ये खूपच चांगली कामगिरी आहे. त्याने 77 सामन्यात 34.88 च्या सरासरीने 2442 धावा केल्या आहेत. त्याने एक शतक आणि 19 अर्धशतक झळकावली आहेत. आयपीएलच्या या सीजनमध्ये ऋतुराजला प्रभावी कामगिरी करता आली नाही. गायकवाडने या सीजनमध्ये 14 सामन्यात 26.29 च्या सरासरीने 368 धावा केल्या. 126 त्याचा स्ट्राइक रेट होता. तीन हाफ सेंच्युरी त्याने झळकावल्या. त्याच्या टॅलेंटच्या हिशोबाने ही फार चांगली कामगिरी नाहीय.

भारताची संभाव्य Playing 11

ऋषभ पंत, (कॅप्टन) इशान किशन, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि आवेश खान,