AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Aus 1st Test : 2 प्लेयर, 1 जागा, कोणाला खेळवायच? त्यावरुन रोहित-राहुलमध्ये मतभेद ?

Ind vs Aus 1st Test : केएल राहुलचा परफॉर्मन्स खराब आहे. तो फॉर्ममध्ये सुद्धा नाहीय. पण टीमचा उपकर्णधार आहे. त्यामुळे ओपनर म्हणून त्याला संधी मिळणार, हे निश्चित आहे. पण मिडल ऑर्डरमध्ये एक जागा उरते, तिथे कोणाला खेळवायच? हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

Ind vs Aus 1st Test : 2 प्लेयर, 1 जागा, कोणाला खेळवायच? त्यावरुन रोहित-राहुलमध्ये मतभेद ?
Rohit sharma-Rahul dravid
| Updated on: Feb 09, 2023 | 7:40 AM
Share

Ind vs Aus 1st Test : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये आजपासून टेस्ट सीरीज सुरु होणार आहे. नागपूर येथे पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. पहिल्या टेस्ट मॅचआधी सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल या दोघांपैकी कोणाला संधी द्यायची? यावरुन कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांचं वेगवेगळं मत आहे. विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत या सीरीजमध्ये खेळत नाहीय. मिडल ऑर्डरमध्ये एक जागा आहे, तिथे सूर्यकुमार आणि गिलपैकी कोणाला संधी द्यायची? यावरुन वादविवाद सुरु आहे. केएल राहुलचा परफॉर्मन्स खराब आहे. तो फॉर्ममध्ये सुद्धा नाहीय. पण टीमचा उपकर्णधार आहे. त्यामुळे ओपनर म्हणून त्याला संधी मिळणार, हे निश्चित आहे. पण मिडल ऑर्डरमध्ये एक जागा उरते, तिथे कोणाला खेळवायच? हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

दोघांमध्ये कोणाच पारडं जड?

सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल दोघेही जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. सूर्यकुमार यादवने T20 मध्ये आपल्या बॅटची ताकत दाखवून दिलीय. दुसऱ्याबाजूला शुभमन गिलने टेस्ट, वनडे आणि टी 20 तिन्ही फॉर्मेटमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केलीय. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या कसोटीसाठी तो सुद्धा प्रमुख दावेदार आहे. दोघांची तुलना करायची झाल्यास, सूर्यकुमारची बॅट फक्त टी 20 मध्ये तळपलीय. त्याचवेळी शुभमनने तिन्ही फॉर्मेटमध्ये सरस कामगिरी केलीय. त्यामुळे त्याचं पारड थोडं जड आहे.

कॅप्टन आणि कोचमध्ये मतभेद

कॅप्टन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या कसोटीसाठी सूर्यकुमार यादवच्या समावेशाला अनुकूल आहे. सूर्यकुमार प्लेइंग 11 मध्ये खेळवावं, असं त्याचं मत आहे. त्याचवेळी हेड कोच राहुल द्रविड यांचा शुभमन गिलसाठी आग्रह आहे. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत शुभमन गिलला संधी द्यावी, असं त्यांचं मत आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणाला खेळवायच? यावरुन कॅप्टन आणि कोचमध्ये मतभेद दिसतायत. तो वेळेला ऋषभ पंतसारखा खेळू शकतो

ऋषभ पंत टेस्ट मॅचमध्ये सुद्धा वनडेसारखी बॅटिंग करतो. त्याच्या बॅटिंगमुळेच टीम इंडियाने काही कसोटी सामने जिंकले होते. डावाची पडझड झाली, तरी ऋषभ कधी संथ खेळला नाही. उलट त्याने आक्रमक बॅटिंग करुन समोरच्या टीमला वरचढ ठरु दिलं नाही. त्यामुळे टीम इंडियाची धावगती वेगाने वाढली. धावफलकावर सुद्धा चांगल्या धावा लागल्या. ऋषभच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव हेच काम करु शकतो. म्हणून रोहित शर्माचा सूर्यकुमार यादवसाठी आग्रह आहे. सूर्यकुमार प्रसंगी फटकेबाजी करुन टीमसाठी वेगाने धावा जमवू शकतो, असं रोहितच मत आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.