AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 World Cup मध्ये भारताचा सलग दुसरा विजय, आयर्लंडला 201 धावांनी पराभूत करत सुपर सिक्समध्ये एन्ट्री!

भारताने आयर्लंडवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने सुपर सिक्सच्या दिशेने आपलं पहिलं पाऊल टाकलं आहे. भारताचा अ गटातील साखळी फेरीतील सलग दुसरा विजय आहे. त्यामुळे भारताचं सुपर सिक्समधील स्थान निश्चित झालं आहे.

U19 World Cup मध्ये भारताचा सलग दुसरा विजय, आयर्लंडला 201 धावांनी पराभूत करत सुपर सिक्समध्ये एन्ट्री!
U19 World Cup स्पर्धेत भारताचा सर्वात मोठा विजय, आयर्लंडला चीतपट करत सुपर सिक्समध्ये मिळवलं स्थान
| Updated on: Jan 25, 2024 | 7:54 PM
Share

मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि आयर्लंड यांच्यात दुसरा सामना पार पडला. हा सामना भारताने मोठ्या फरकाने जिंकला. आयर्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय सपशेल चुकीचा ठरला. कारण भारताने 50 षटकात 7 गडी गमवून 301 धावा केल्या आणि विजयासाठी 302 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा डाव पत्त्यासारखा कोसळला. एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. अवघ्या 30 षटकांमध्ये संपूर्ण संघ तंबूत परतला. भारताकडून नमन तिवारी, सौमी कुमार पांडे आणि धनुष गौडा यांनी आपल्या भेदक गोलंदाजीने आयर्लंडला बॅकफूटवर ढकललं आणि विजय मिळवला. आता भारताचं सुपर सिक्समधील स्थान जवळपास निश्चित झालं आहे. भारताने आयर्लंडला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने फायदा झाला आहे. त्यामुळे रनरेट वाढला असून सुपर सिक्सचा मार्ग मोकळा झाला. अ गटात भारताचा शेवटचा सामना युएसएसोबत 28 जानेवारीला आहे.

भारताचा डाव

भारताकडून आदर्श सिंग आणि आर्शिन कुलकर्णी ही जोडी मैदानात आली होती. या जोडीने पहिल्या गड्यासाठी 32 धावांची भागीदारी केली. वैयक्तिक 17 धावांवर असताना आदर्श सिंग बाद झाला. त्यानंतर मुशीर खान याने मोर्चा सांभाळला. आर्शिन कुलकर्णी 32 धावा करून तंबूत परतल्यानंतर मुशीरला कर्णधार उदय सहारन याची साथ मिळाली. मुशीर खानने 106 चेंडूत 118 धावा केल्या. तर कर्णधार उदय सहारन याने 75 धावांची खेळी केली. अरावेली अवनिश रावने 22, सचिन धसने 21*, प्रियांशु मोलियाने 2 आणि मुरुगन अभिषेकने 0 धावा केल्या.

भारताकडून नमन तिवारी, सौम्य कुमार पांडे आणि धनुष गौडा यांनी भेदक गोलंदाजी करत आयर्लंडचा संपूर्ण संघ तंबूत पाठवला. आयर्लंडला फक्त धावा करता आल्या. नमन तिवारीने 4, सौम्य कुमार पांडेने 3,  तर मुरुगन अभिषेक, उदय सहारन आणि धनुष गौडाने प्रत्येकी 1 गडी बाद केला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

आयर्लंड प्लेइंग इलेव्हन | फिलिपस ले रॉक्स (कॅप्टन), जॉर्डन नील, रायन हंटर (विकेटकीपर), कियान हिल्टन, स्कॉट मॅकबेथ, जॉन मॅकनॅली, कार्सन मॅककुलो, ऑलिव्हर रिले, मॅकडारा कॉस्ग्रेव्ह, डॅनियल फोर्किन आणि फिन लुटन.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंह, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, प्रियांशू मोलिया, अरावेली अवनीश (विकेटकीपर), सचिन धस, मुरुगन अभिषेक, धनुष गौडा, सौम्य पांडे आणि नमन तिवारी.

Follow Us
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी