IND vs WI: एकट्या विराटलाच आराम नाही, विंडिंज विरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी संघ निवडीआधी महत्त्वाची Update

IND vs WI: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी (India West indies Tour) टीम इंडियाची निवड कुठल्याही क्षणी होऊ शकते. भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर पाच टी 20 सामन्यांची सीरीज खेळणार आहे.

IND vs WI: एकट्या विराटलाच आराम नाही, विंडिंज विरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी संघ निवडीआधी महत्त्वाची Update
team india
| Updated on: Jul 14, 2022 | 11:17 AM

मुंबई: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी (India West indies Tour) टीम इंडियाची निवड कुठल्याही क्षणी होऊ शकते. भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर पाच टी 20 सामन्यांची सीरीज खेळणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यातील वनडे सीरीजसाठी आधीच संघाची घोषणा झाली आहे. पण टी 20 साठी अजून संघ निवड जाहीर झालेली नाही. या संघ निवडीआधी मोठी बातमी समोर येतेय. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, वेस्ट इंडिजमधील टी 20 सीरीजसाठी फक्त विराट कोहलीला (Virat kohli) एकट्यालाच विश्रांती मिळणार नाही. त्याच्याशिवाय जसप्रीत बुमराहला (Jasprit bumrah) सुद्धा आराम देण्यात येईल. बोटाच्या दुखापतीमधून सावरलेल्या कुलदीप यादवची देखील संघात निवड होऊ शकते.

विराटला कोणाचा सपोर्ट?

विराट कोहलीच्या टी 20 संघातील भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येतय. पण आगामी टी 20 वर्ल्ड कप मध्ये तो संघाचा महत्त्वाचा सदस्य असेल. म्हणूनच मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा सातत्याने त्याला सपोर्ट करतायत. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. टी 20 मालिका भारताने जिंकली. आता वनडे सीरीज सुरु आहे. पहिल्या वनडेत विराट ग्रोइनच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. दुसऱ्या वनडेतही तो खेळण्याची शक्यता कमी आहे.

अजून एका खेळाडूला विश्रांती

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या विराट कोहलीच्या खराब फॉर्मची सातत्याने चर्चा सुरु आहे. विराट वरुन टीम इंडियाच्या माजी खेळाडूंमध्ये दोन गट पडले आहेत. पण टीम मॅनेजमेंट सातत्याने विराटला बॅक करतेय. विराटला विंडिज विरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी आराम दिला जाऊ शकतो. तसंच वर्कलोड कमी करण्यासाठी म्हणून जसप्रीत बुमराहला सुद्धा विश्रांती दिली जाऊ शकते.

डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाचं कमबॅक?

आयपीएल 2022 मध्ये जबरदस्त गोलंदाजी करणारा डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव टीम मध्ये कमबॅक करु शकतो. बोटाच्या दुखपातीमधून तो सावरला आहे. त्याला विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेत संधी मिळू शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सीरीजच्यावेळी कुलदीपला सराव करताना दुखापत झाली होती. त्यामुळे तो या सीरीज मध्ये खेळू शकला नव्हता.