AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा वनडे सामना रद्द होणार?

IND vs AUS 3rd odi : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही टीम्ससाठी तिसरा वनडे सामना महत्त्वाचा आहे. कारण हा सामना जिंकणारा संघ सीरीज विनर ठरणार आहे. बॉर्डर-गावस्कर टेस्ट सीरीज टीम इंडियाने आधीच जिंकली आहे.

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा वनडे सामना रद्द होणार?
ind vs aus 2nd odiImage Credit source: PTI
| Updated on: Mar 21, 2023 | 8:23 AM
Share

IND vs AUS, Chennai Weather Updates : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा वनडे सामना उद्या 22 मार्चला चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा निर्णायक वनडे सामना आहे. हा सामना जिंकणारा संघ सीरीज जिंकणार आहे. कारण दोन्ही टीम्स 1-1 बरोबरीत आहेत. मुंबईतला पहिला वनडे सामना टीम इंडियाने, तर विशाखापट्टनममध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. दोन्ही टीम्ससाठी ही मॅच ‘करो या मरो’ अशी आहे. सीरीज विनसाठी टीम इंडियाला हा सामना जिंकण महत्त्वाच आहे.

या तिसऱ्या वनडे मॅचआधी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. चेन्नईमधून भारतीय चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. तिसऱ्या वनडे मॅचमध्ये पाऊस खेळ बिघडवू शकतो. असं झाल्यास तीन वनडे सामन्यांची सीरीज 1-1 ने ड्रॉ होईल.

वनडे सीरीज जिंकण्याची संधी निसटणार?

भारताच्या हातून ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीज जिंकण्याची संधी निसटेल. चेन्नईमध्ये सोमवारी जोरदार पाऊस झाला. मंगळवारी सुद्धा चेन्नईत पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. उद्या म्हणजे 22 मार्चला तिसऱ्या वनडे सामन्यावर सुद्धा पावसाच सावट आहे.

हवामान विभागाचा अंदाज काय आहे?

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा निर्णायक वनडे सामना चेपॉक स्टेडियमवर दुपारी 1.30 वाजता सुरु होईल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मॅचच्या दिवशी 12 वाजता पाऊस कोसळण्याची शक्यता 16 टक्के आहे. 13 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. दिवस पुढे सरकेल, तशी पावसाची शक्यता कमी आहे. पण मध्येच पावसामुळे खेळ थांबवला जाऊ शकतो. आता WTC मध्ये सामना

वनडे सीरीजआधी भारत-ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर टेस्ट सीरीज झाली. या मध्ये टीम इंडियाने 2-1 अशी बाजी मारली. या टेस्ट सीरीजनंतर दोन्ही टीम्सनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडमध्ये आयसीसीची WTC ट्रॉफी जिंकण्यासाठी दोन्ही टीम्स भिडतील.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.