
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेची सुरुवात जशी झाली तसाच शेवटही झाला. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना जिंकला. भारताने त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात सलग 2 विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. तर मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामनाही पावसामुळे पूर्ण झाला नाही. ऑस्ट्रेलियाने भारताला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारताने 4.5 ओव्हरमध्ये बिनबाद 52 रन्स केल्या. मात्र त्यानंतर खराब हवामान आणि पावसाची युती झाली. त्यामुळे सामना रद्द करावा लागला. भारताने अशाप्रकारे सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. भारताने यासह ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट गोड केला. आता टीम इंडिया मायदेशात 14 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि अंतिम टी 20i सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली आहे. भारताने यासह ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे.
पाचव्या आणि अंतिम टी 20I सामन्यात हवामानानंतर पावसाने विघ्न घातलं. जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे जवळपास दीड ते 2 तासांचा खेळ वाया गेला आहे. त्यामुळे आता पूर्ण 20 ओव्हरचा खेळ होण्याची शक्यता फार कमी आहे.
गाबात अखेर पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे आता खेळपट्टी कोरडी झाल्यानंतर खेळाला पुन्हा केव्हा सुुरवात होतेय? याची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा लागून आहे. भारताने 4.5 ओव्हरमध्ये बिनबाद 52 रन्स केल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सामना खराब हवामानामुळे पहिल्या डावातील 4.5 ओव्हरनंतर थांबवण्यात आला. त्यानंतर आता काही मिनिटांनी पावसाची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता खेळाला सुरुवात होण्यासाठी आणखी वेळ लागणार असल्याचं स्पष्ट आहे.
खराब हवामानामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पाचव्या टी 20i सामन्यातील खेळ थांबवण्यात आला आहे. भारताने खेळ थांबवला. भारताने 4.5 ओव्हरमध्ये बिनबाद 52 रन्स केल्या. अभिषेक 23 आणि शुबमन 23 धावांवर नाबाद आहेत.
शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने टीम इंडियाला आक्रमक आणि वादळी सुरुवात करुन दिली आहे. या सलामी जोडीने नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे. शुबमन आणि अभिषेक या जोडीने प्रत्येकी 20-20 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारताकडून शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा केल्या.
मिचेल मार्श (कॅप्टन), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (विकेटकीपर), टिम डेव्हिड, जोश फिलिप, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस आणि अॅडम झॅम्पा.
अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
टीम इंडियाने पाचव्या आणि अंतिम सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने रिंकू सिंह याला तिलक वर्मा याच्या जागी संधी दिली आहे. तिलक वर्मा याला विश्रांती दिल्याचं सूर्याने टॉसनंतर सांगितलं.
ऑस्ट्रेलियाने पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्यात टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकला आहे. कॅप्टन मिचेल मार्श याने फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्या हिशोबाने मार्शने फिल्डिंगचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी पावणे 2 वाजता सुरुवात होईल. तर 1 वाजून 15 मिनिटांनी टॉस होणार आहे.
मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (विकेटकीपर), टिम डेव्हिड, जोश फिलिप, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, एडम झम्पा, मॅथ्यू कुहनेमन, मिचेल ओवेन आणि महली बियर्डमन.
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा.
यजमान ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर अंतिम सामन्यात भारताला सामन्यासह मालिका जिंकण्यापासून रोखण्याचं आव्हान आहे.