IND vs ENG 1st ODI Match Preview: टी 20 पाठोपाठ आता ODI सीरीज मध्ये इंग्लंडला धूळ चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज

IND vs ENG 1st ODI Match Preview: टी 20 मालिका (T 20 series) संपली असून आता मंगळवारपासून इंग्लंड विरुद्ध वनडे सीरीज सुरु होत आहे. टी 20 सीरीज मध्ये भारतीय संघाने दमदार खेळ दाखवला.

IND vs ENG 1st ODI Match Preview: टी 20 पाठोपाठ आता ODI सीरीज मध्ये इंग्लंडला धूळ चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज
Team india
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 3:57 PM

मुंबई: टी 20 मालिका (T 20 series) संपली असून आता मंगळवारपासून इंग्लंड विरुद्ध वनडे सीरीज सुरु होत आहे. टी 20 सीरीज मध्ये भारतीय संघाने दमदार खेळ दाखवला. एकदिवसीय मालिकेतही तशीच कामगिरी करण्याचा भारतीय संघाचा (Team India) प्रयत्न असेल. टी 20 प्रमाणे वनडे मालिका भारतासाठी सोपी नसेल. कारण वनडे मध्ये इंग्लंडचा संघ मजबूत आहे. ओव्हलच्या मैदानावर (Oval Ground) पहिला वनडे सामना होणार आहे. भारतीय संघ आधी कसोटी, नंतर टी 20 आणि आता वनडे एका नवीन फॉर्मेट मध्ये खेळणार आहे. टी 20 मध्ये ओव्हर्स कमी असतात, त्यामुळे फटकेबाजी करावी लागते. पण वनडे मध्ये वेळ मिळतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच मोठे फटके खेळण्याची आवश्यकता नाही. इंग्लंडने मागच्या काही वर्षात आक्रमक क्रिकेट खेळून वनडे क्रिकेट खेळण्याची पद्धतच बदलली आहे. इंग्लंडच्या टीमला 2019 वर्ल्ड कप मध्ये याचा फायदा झाला. त्यांनी पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कपवर नाव कोरलं.

रोहित शर्मा काय म्हणाला?

ऑस्ट्रेलियात होणारा टी 20 वर्ल्ड कप लक्षात घेता, रोहित शर्माने व्हाइट बॉल मध्ये प्रत्येक सामना महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे. आमच्यासाठी सर्वच सामने महत्त्वाचे आहेत, असं रोहितने म्हटलं आहे. वनडे प्राथमिकता नाही, असा विचार करुन आम्ही क्रिकेट खेळणार नाही. आम्ही काही बदल करु, पण आमचं लक्ष्य विजय आहे, असं रोहित म्हणाला.

शिखर धवनसाठी महत्त्वाची सीरीज

इंग्लंड विरुद्धच्या वनडे सीरीज मध्ये शिखर धवन सारखे खेळाडू महत्त्वाचे आहेत. कारण आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यात शिखर धवनकडे संघाचं नेतृत्व आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मर्यादीत संधी मिळूनही शिखर धवनने आपली छाप उमटवलीय. वनडे असो, वा आयपीएल शिखर धवनने सातत्याने धावा केल्या आहेत.

अपयश धुवून काढण्याच जोस बटलरचा इरादा

भारतीय चाहत्यांना विराट कोहली कधी फॉर्म मध्ये परतणार त्याची चिंता आहे. य़ा दौऱ्यात टेस्ट आणि टी 20 मध्ये विराट कोहली फ्लॉप ठरलाय. बदलता फॉर्मेट पाहता पहिल्या चेंडूपासून धावा करण्याचा विराट वर दबाव असेल. वनडे क्रिकेट मध्ये खेळताना विराट कोहलीकडे थोडा जास्त वेळ असेल. मॉर्गनच्या जागी आता जोस बटलरकडे इंग्लंडच नेतृत्व आहे. टी 20 सीरीजमध्ये त्याला स्वत:ला प्रभाव पाडता आला नाही तसंच ही मालिका सुद्धा इंग्लंडने गमावली. आता वनडे मालिकेत मागचं अपयश धुवून काढण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.