AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli | कर्णधार विराट कोहलीच्या नावावर लाजिरवाणा विक्रम, ‘या’ बाबतीत गांगुलीचा रेकॉर्ड ब्रेक

इंग्लंडने पहिल्या टी 20 सामन्यात भारतावर 8 विकेट्सने (india vs england 1st t 20i) शानदार विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सपशेल अपयशी ठरला. विराट कोहली (Virat Kohli) शून्यावर बाद झाला.

Virat Kohli | कर्णधार विराट कोहलीच्या नावावर लाजिरवाणा विक्रम, 'या' बाबतीत गांगुलीचा रेकॉर्ड ब्रेक
इंग्लंडने पहिल्या टी 20 सामन्यात भारताचा 8 विकेट्सने (india vs england 1st t 20i) शानदार विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सपशेल अपयशी ठरला. विराट कोहली (Virat Kohli) शून्यावर बाद झाला.
| Updated on: Mar 12, 2021 | 11:10 PM
Share

अहमदाबाद : इंग्लंडने पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियावर 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. या सामन्यात टीम इंडियाच्या पहिल्या 3 फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. शिखर धवन 4. केएल राहुल 1 तर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) शून्यावर बाद झाला. यासह विराटने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा नकोशा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. (india vs england 1st t 20i Virat Kohli became the most duck Indian captain in international cricket)

काय आहे रेकॉर्ड?

विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. विराटने याबतीतत गांगुलीला पछाडलं आहे. गांगुली एकूण 13 वेळा शून्यावर बाद झाला. तर विराटची ही कर्णधार म्हणून शून्यावर बाद होण्याची 14 वेळ ठरली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले भारतीय कर्णधार

विराट कोहली-14 वेळा सौरव गांगुली-13 वेळा एमएस धोनी-11 वेळा कपिल देव-10 वेळा एमएके पटौदी-8 वेळा

धोनीच्या पंक्तीत स्थान

विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. त्याचसोबत विराटने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. इंग्लंड विरुद्धच्या या पहिल्या टी 20 सामन्यात खेळायला उतरताच विराट 300 टी 20 सामने खेळणारा 5 वा भारतीय ठरला. आतापर्यंत टीम इंडियाकडून धोनी, सुरेश रैना, रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकने ही कामगिरी केली आहे.

सामन्याचा धावता आढावा

इंग्लंडने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडले. टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात राहिली. भारताने पहिले 3 विकेट्स झटपट गमावले. मात्र त्यानंतर श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतने फटकेबाजी केली. श्रेयस अय्यरने सर्वाधिक 67 धावांची खेळी केली. तर पंतने 21 रन्स केल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर भारताने 124 धावांपर्यंत मजल मारली. यामुळे इंग्लंडला विजयासाठी 125 धावांचे माफक आव्हान मिळाले.

इंग्लंडची शानदार सुरुवात

इंग्लंडने हे विजयी आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात 15.3 ओव्हरमध्ये पूर्ण केल. इंग्लंडकडून जेसन रॉयने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. जोस बटलरने 28 तर जॉनी बेयरस्टोने नाबाद 26 धावा केल्या. टीम इंडियाकडून युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

संबंधित बातम्या :

India vs England 2021, 1st T20 | जेसन रॉय-जॉस बटलरची फटकेबाजी, इंग्लंडचा भारतावर 8 विकेट्सने शानदार विजय

Video | व्वा पंत ! रिषभचा जोफ्रा आर्चरच्या बोलिंगवर अफलातून रिव्हर्स स्वीप, पाहा व्हिडीओ

(india vs england 1st t 20i Virat Kohli became the most duck Indian captain in international cricket)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.