Video | व्वा पंत ! रिषभचा जोफ्रा आर्चरच्या बोलिंगवर अफलातून रिव्हर्स स्वीप, पाहा व्हिडीओ

रिषभ पंतने (rishabh pant Played reverse sweep) जोफ्रा आर्चर गोलंदाजीवर (Jofra Archer) रिव्हर्स स्वीप फटका मारला. पंतने मारलेला फटका षटकार ठरला.

Video | व्वा पंत  ! रिषभचा जोफ्रा आर्चरच्या बोलिंगवर अफलातून रिव्हर्स स्वीप, पाहा व्हिडीओ
रिषभ पंतने (rishabh pant Played reverse sweep) जोफ्रा आर्चर गोलंदाजीवर (Jofra Archer) रिव्हर्स स्वीप फटका मारला. पंतने मारलेला फटका षटकार ठरला.
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 8:54 PM

अहमदाबाद : टीम इंडियाचा आक्रमक विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात (India vs England 1st T20) धावांची खेळी केली. पंतने एकूण 23 चेंडूत 2 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने एकूण 21 धावा केल्या. या खेळीदरम्यान पंतने शानदार सिक्स खेचला. पंतने इंग्लडंचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या (Jofra Archer) बोलिंगवर रिव्हर्स स्वीप (Reverse Sweep) मारत हा सिक्स फटकावला आहे. (india vs england 1st t20 rishabh pant Played reverse sweep against Jofra Archer)

जोफ्रा आर्चर सामन्यातील चौथी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर पंतने विकेटकीपरच्या डोक्यावरुन रिव्हर्स स्वीप मारला. पंतने मारलेला फटका सिक्सर ठरला. पंतने मारलेल्या रिव्हर्स स्वीपचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फटक्यासाठी पंतचं जोरदार कौतुक करण्यात येत आहे.

दरम्यान पंतने याआधी इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर अशाच प्रकारे रिव्हर्स स्वीप मारला होता. दरम्यान रिषभने मारलेल्या या दोन्ही फटक्याचे व्हिडीओ आता नेटीझन्स शेअर करत आहेत. तसेच पंत ट्विटरवर ट्रेंड करत आहे.

इंग्लंडला विजयासाठी 125 धावांचे आव्हान

टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 125 धावांचे आव्हान दिले आहे.  भारताने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 124 धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यरने 48 चेंडूत 67 धावा केल्या. यामध्ये त्याने 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याशिवाय रिषभ पंतने 21 तर हार्दिक पांड्याने 19 धावांची खेळी केली. तर इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

टीम इंडियाचे अंतिम 11 शिलेदार

विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत(यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन

इयन मॉर्गन (कॅप्टन), जेसन रॉय, जोस बटलर, डेव्हीड मलान, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद आणि मार्क वुड.

संबंधित बातम्या :

India vs England 2021, 1st T20, LIVE Score | टीम इंडियाला चौथा धक्का, रिषभ पंत आऊट

Rohit Sharma | ‘हिटमॅन’ रोहित शर्माला इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत मोठा रेकॉर्ड करण्याची संधी

(india vs england 1st t20 rishabh pant Played reverse sweep against Jofra Archer)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.