AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma | ‘हिटमॅन’ रोहित शर्माला इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत मोठा रेकॉर्ड करण्याची संधी

इंग्लंड विरुद्धच्या या 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत (india vs england t20i series) रोहित शर्माला (Rohit Sharma) अनेक विक्रम करण्याची संधी आहे.

Rohit Sharma | 'हिटमॅन' रोहित शर्माला इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत मोठा रेकॉर्ड करण्याची संधी
इंग्लंड विरुद्धच्या या 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत (india vs england t20i series) रोहित शर्माला (Rohit Sharma) अनेक विक्रम करण्याची संधी आहे.
| Updated on: Mar 12, 2021 | 6:59 PM
Share

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (india vs england t20 series) यांच्यात आजपासून (12 मार्च) टी 20 मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील एकूण 5 सामने हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेत टीम इंडियाचा सलामीवीर हिटमॅन रोहित शर्माला (Rohit Sharma) मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी आहे. रोहित या 5 सामन्यात हा विक्रम आरामात आपल्या नावे करु शकतो. (india vs england t20i series Rohit Sharma has a chance to record the most sixes in T20 cricket)

काय आहे विक्रम?

रोहितला टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड (Most Sixes In T 20I) करण्याची संधी आहे. सर्वाधिक सिक्सच्या यादीत न्यूझीलडंचा मार्टिन गुप्टील (Martin Guptill) अव्वल क्रमांकावर आहे. मार्टिनने 99 सामन्यात 139 षटकार खेचले आहेत. मार्टिनने ही कामगिरी ऑस्ट्रेलिया (nz vs aus) विरुद्ध झालेल्या 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत केली होती. यासह त्याने अव्वल क्रमांक पटकावलं. रोहितने  108 टी 20 सामन्यात 127 गगनचुंबी षटकार लगावले आहेत. त्यामुळे रोहितला मार्टिनचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी 13 षटकारांची आवश्यकता आहे. त्यामुळे या मालिकेत रोहित कशी कमागिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

9 हजार धावा पूर्ण करण्याची संधी

रोहितला टी 20 क्रिकेटमध्ये 9 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्याची संधी आहे. यासाठी रोहितला 26 धावांची आवश्यकता आहे. यामुळे रोहितने 26 धावा करताच तो विराटच्या पंक्तीत जाऊन पोहचेल. तसेच रोहित विराटनंतर टीम इंडियाकडून अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरेल. रोहितच्या नावावर ताज्या आकडेवारीनुसार 340 सामन्यात 8 हजार 974 धावा आहेत. यामुळे रोहित 26 धावा करताच तो विराटच्या पंक्तीत जाऊन पोहचेल. तसेच रोहित विराटनंतर टीम इंडियाकडून अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरेल.

विराटचा विक्रम मोडण्याची संधी

याशिवाय विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करण्याची संधी आहे. त्यासाठी रोहितला 156 धावांची गरज आहे. सर्वाधिक धावांच्या यादीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराटने 2 हजार 928 धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माच्या नावे 2 हजार 773 रन्सची नोंद आहे. त्यामुळे रोहितला विराटला पछाडण्यासाठी 156 धावांची आवश्यकता असणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs England 2021, 1st T20, LIVE Score | इंग्लंडचा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय

India vs England T20I Series | इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेआधी क्रिकेट चाहत्यांसाठी ‘गुड न्यूज’

(india vs england t20i series Rohit Sharma has a chance to record the most sixes in T20 cricket)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.