IND vs ENG : दुसरा एकदिवसीय सामना कटकमध्ये, मॅचच्या वेळेत बदल?
India vs England 2nd Odi Live Streaming : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात झाली होती. दुसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी 20 मालिकेनंतर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने 6 जानेवारीला झालेल्या सलामीच्या सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर आता टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया सलग दुसरा विजय मिळवण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहे. तर इंग्लंडसमोर मालिकेतील आव्हान कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे दुसरा सामना हा मालिकेच्या दृष्टीने निर्णायक असा ठरणार आहे. उभयसंघातील दुसऱ्या सामन्याला किती वाजता सुरु होईल? हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना केव्हा?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना रविवारी 9 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना कुठे?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना हा कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
इंग्लंड टीम : फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), जेकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर, साकिब महमूद, गुस ऍटकिन्सन, मार्क वुड, जेमी ओव्हरटन आणि जेमी स्मिथ.
टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, विराट कोहली, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर आणि अर्शदीप सिंह.
