IND vs ENG: रोहितचा रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला, तर ‘हा’ खेळाडू बनणार कॅप्टन

IND vs ENG: इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) 1 जुलै पासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) खेळणार की, नाही, ते आज स्पष्ट होईल.

IND vs ENG: रोहितचा रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला, तर 'हा' खेळाडू बनणार कॅप्टन
rohit sharma Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 1:30 PM

मुंबई: इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) 1 जुलै पासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) खेळणार की, नाही, ते आज स्पष्ट होईल. रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली असून सध्या तो आयसोलेशनमध्ये आहे. मागच्या आठवड्यात सराव सामन्याच्या तिसऱ्यादिवशी रोहित शर्माचा कोरोना (Covid 19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आज रोहितची पुन्हा कोरोना चाचणी केली जाईल. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर तो एजबॅस्टन कसोटीत खेळण्याची शक्यता आहे. या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे. मागच्यावर्षी कोविडमुळे या मालिकेतील एक कसोटी सामना रद्द झाला होता. तो आता खेळला जाणार आहे. रोहित शर्माला कोरोना झाल्यामुळे मयंक अग्रवालला तातडीने इंग्लंडला रवाना करण्यात आलं. कारण रोहित शर्मा खेळला नाही, तर फक्त कॅप्टनशिपचाच नाही, सलामीच्या जागेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो.

स्टँड बायवर कॅप्टनशिपसाठी दुसरा खेळाडू तयार

निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा आज इंग्लंडमध्ये पोहोचणार आहेत. रोहित संदर्भात हेड कोच राहुल द्रविड आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. रोहितच्या खेळण्याबद्दल अजूनही साशंकता आहे. त्याच्याजागी संघाच नेतृत्व करण्यासाठी जसप्रीत बुमराहला स्टँड बायवर ठेवण्यात आलं आहे. तो पाचव्या कसोटीत टीम इंडियाच नेतृत्व करु शकतो. उपकर्णधार केएल राहुलही या सीरीजमध्ये खेळत नाहीत. ग्रोइनच्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी तो जर्मनीला गेला आहे.

मॅच फिट असेल, तर प्रॉब्लेम नाही

“रोहित अजून आयसोलेशनमध्ये आहे. आज त्याची कोरोना टेस्ट होईल. रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर तो कसोटी सामन्यात खेळू शकतो. तो मॅच फिट असून प्रॉब्लेम नाही” असं निवड समितीच्या सदस्याने इनसाइड स्पोर्ट्ला सांगितलं.

खेळाडू कोरोनाला गांभीर्याने कधी घेणार?

कोरोनाचा धोका लक्षात घेऊन बीसीसीआयने आधीच खेळाडूंना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं होतं. इंग्लंड दौऱ्यावर गेलेले खेळाडू बाजारात फिरताना दिसले होते. त्यांनी तोंडाला मास्कही लावला नव्हता. रोहितला कोरोना झाल्यानंतरही संघातील अन्य खेळाडू तितके गंभीर दिसलेले नाहीत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.