IND vs ENG: जसप्रीत बुमराह मैदानाबाहेर जातच Rishabh Pant कडून दोन मोठे ब्लंडर, विराट कोहलीने सुद्धा दिली साथ

IND vs ENG: सध्या भारत या कसोटी मालिकेत 2-1 ने पुढे आहे. भारताला 15 वर्षानंतर कसोटी मालिका विजयाची संधी आहे. आज कसोटीचा चौथा दिवस आहे.

IND vs ENG: जसप्रीत बुमराह मैदानाबाहेर जातच Rishabh Pant कडून दोन मोठे ब्लंडर, विराट कोहलीने सुद्धा दिली साथ
ravindra jadeja
Image Credit source: AP/PTI
| Updated on: Jul 04, 2022 | 10:28 PM

मुंबई: एजबॅस्टन कसोटीत भारताने इंग्लंडला विजयासाठी 378 धावांच लक्ष्य दिलं आहे. इंग्लंडला एलेक्सी लीस (56) आणि झॅक क्रॉली (46) या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी शतकी भागीदारी केली. भारताला तीन विकेट झटपट मिळाल्या. पण जॉनी बेअरस्टो (Jonny Baristow) आणि ज्यो रुट जोडी मैदानात आहे. दोन्ही संघांना विजयाची समान संधी आहे. इंग्लंडने अजूनपर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये इतक्या मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केलेला नाही. भारताचा एजबॅस्टन मध्ये इतिहास रचण्याचा प्रयत्न आहे. सध्या भारत या कसोटी मालिकेत 2-1 ने पुढे आहे. भारताला 15 वर्षानंतर कसोटी मालिका विजयाची संधी आहे. आज कसोटीचा चौथा दिवस आहे. आज ऋषभ पंतमुळे (Rishabh Pant) तिसऱ्यासत्रात भारताच मोठं नुकसान झालं. पंतच्या या चुकीमध्ये विराट कोहलीने (Virat kohli) सुद्धा त्याला साथ दिली. तिसऱ्या सत्रात बुमराह काही वेळासाठी मैदानाबाहेर गेला होता. त्यावेळी उपकर्णधार म्हणून ऋषभ पंतकडे सूत्र होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 मालिकेत कर्णधारपद भूषवणारा पंत यशस्वी नेतृत्व संभाळेल, असा बुमराहला विश्वास होता.

रुट स्वीपचा फटका चुकला

बुमराह पंतकडे जबाबदारी सोपवून मैदानाबाहेर गेला. या दरम्यान दोन ओव्हरमध्येच पंतमुळे भारताचं दोनदा नुकसान झालं. पंतने 2 षटकात 2 रिव्यू गमावले. 31 व्या षटकात जाडेजाने रुटला ओव्हर द विकेट चेंडू टाकला. चेंडू लेंग स्टम्पच्या भरपूर जवळ होता. रुट स्वीपचा फटका चुकला. पंतने रवींद्र जाडेजा आणि विराट कोहली बरोबर चर्चा करुन शेवटच्या सेकंदाला रिव्यू घेतला. पण त्याचा उपयोग झाला नाही. चेंडू लेंग स्टम्पच्या बाहेर होता.

पंतने पुढच्याच षटकात पुन्हा तीच चूक केली

पंतने पुढच्याच षटकात पुन्हा तीच चूक केली. आणखी एक रिव्यू गमावला. 32 व्या षटकात मोहम्मद शमीच्या तिसऱ्या चेंडूवर रुट विरोधात भारताने रिव्यू मागितला. पंतचा निर्णय दुसऱ्यांदा चुकला. बुमराहच्या अनुपस्थितीत दोन ओव्हरमध्ये दोन रिव्यू गमावले.