IND vs ENG: Rishabh pant ने नवीन रेकॉर्ड बनवला, 90 वर्षाच्या भारताच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

IND vs ENG: पंतने एजबॅस्टन कसोटीत दुसऱ्याडावात 76 चेंडूत अर्धशतक झळकावलं. दुसऱ्याडावात इंग्लंडचे वेगवान गोलंदाज कमालीची गोलंदाजी करत होते. पण पंत थांबला नाही.

IND vs ENG: Rishabh pant ने नवीन रेकॉर्ड बनवला, 90 वर्षाच्या भारताच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
rishabh-pant
Image Credit source: AFP
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jul 04, 2022 | 6:48 PM

मुंबई: पहिल्याडावात शतकी खेळी करणाऱ्या ऋषभ पंतने (Rishabh Pant) दुसऱ्याडावात अर्धशतक झळकावलं. परदेशात शतकानंतर अर्धशतक झळकावणारा तो भारताचा पहिला विकेटकीपर फलंदाज ठरला आहे. धोनी (Ms dhoni) पासून फारुख इंजीनियर (Farokh Engineer) पर्यंत कोणीही असा कारनामा करु शकलेलं नाही. भारताचे दोनच विकेटकीपर पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्याडावात अर्धशतक झळकवू शकले आहेत. 1973 साली फारुख इंजीनियर यांनी इंग्लंड विरुद्ध मुंबई कसोटीत आधी 121 नंतर 66 धावांची खेळी केली होती. पंत परदेश भूमीवर अशी कामगिरी करणारा ऋषभ पंत पहिला विकेटकीपर आहे.

पण, पंत नाही थांबला

पंतने एजबॅस्टन कसोटीत दुसऱ्याडावात 76 चेंडूत अर्धशतक झळकावलं. दुसऱ्याडावात इंग्लंडचे वेगवान गोलंदाज कमालीची गोलंदाजी करत होते. पण पंत थांबला नाही. त्याने पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्याडावात 7 चौकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावलं. पंत एजबॅस्टन कसोटीच्या दुसऱ्याडावात 57 धावा बनवून आऊट झाला.

रिव्हर्स स्वीपने घात केला

पंतने दुसऱ्याडावात रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याच्या नादात आपला विकेट गमावला. जॅक लीचच्या गोलंदाजीवर त्याने रिव्हर्स स्वीप मारला. चेंडू ग्लोव्हजला लागून स्लीप मध्ये उभ्या असलेल्या ज्यो रुटच्या हातात गेला. जसप्रीत बुमराह बाद झाला असून भारताचा दुसरा डाव 245 धावांवर आटोपला. पहिल्या डावातील 132 धावांच्या आघाडीच्या बळावर भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 377 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. दुसऱ्याडावात भारताकडून चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 66 धावा केल्या. त्यानंतर ऋषभ पंतने दुसऱ्याडावातही 57 धावांची अर्धशतकी खेळी केली.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें