IND vs NZ : न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडिया जाहीर, मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे पहिल्या टेस्टचं नेतृत्त्व

| Updated on: Nov 12, 2021 | 1:53 PM

बीसीसीआयनं न्यूझीलंड विरोधातील कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे विराट कोहलीच्या अनुपस्थित कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे.

IND vs NZ : न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडिया जाहीर, मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे पहिल्या टेस्टचं नेतृत्त्व
Ajinkya Rahane
Follow us on

नवी दिल्ली: बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. न्यूझीलंडचा संघ दोन कसोटी सामन्याच्या आणि टी-20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येत आहे. बीसीसीआयनं न्यूझीलंड विरोधातील कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे विराट कोहलीच्या अनुपस्थित कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. दोन्ही टीममधील कसोटी मालिकेतील पहिला सामना 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये तर दुसरा कसोटी सामना 3 डिसेंबरपासून मुंबईत खेळवला जाणार आहे. बीसीसीआयनं कॅप्टन विराट कोहलीला पहिल्या कसोटीसाठी तर रोहित शर्माला संपूर्ण मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत उपकर्णधार रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

प्रमुख खेळाडूंना विश्रांती

बीसीसीआयने रोहित शर्माशिवाय ऋषभ पंत, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकूर यांनाही विश्रांती दिली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जबरदस्त खेळ दाखवणाऱ्या हनुमा विहारीला संघातून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर सलामीवीर पृथ्वी शॉ आणि स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव यांनाही संधी देण्यात आलेली नाही. या दोघांनाही न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत संधी देण्यात आलेली नाही.

श्रेयस अय्यरला लॉटरी

न्यूझीलंड विरोधातील कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने तब्बल पाच वर्षांनंतर जयंत यादवला संघात संधी दिली आहे. जयंतने शेवटची मालिका 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. याशिवाय दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियातून बाहेर असलेल्या श्रेयस अय्यर आणि आयपीएलमधील प्रसिद्ध गोलंदाज कृष्णा यांना पहिल्यांदाच कसोटी संघात संधी देण्यात आली आहे.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, यू. यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण.

टी-20 मालिकेसाठी संघ यापूर्वीच जाहीर

बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा मंगळवारी केली होती. टी-ट्वेन्टीच्या टीमचं कर्णधारपद रोहित शर्माकडे तर उपकर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आलीय. या मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.

इतर बातम्या:

Video : सोने पे सुहागा, पाकच्या बोलरकडून दोन टप्प्यांचा बॉल, वॉर्नरने स्टेडियमबाहेर भिरकावला, फ्री हिटही मिळाली!

T20 World Cup 2021: टीम इंडिया विरुद्ध विजयाचा शिल्पकार, ऑस्ट्रेलिया विरुद्ध ठरला पराभवास कारणीभूत, शाहीनला गर्व नडला?

India vs new zealand bcci announces test squad for series against nz ajinkya rahane captain in first match