T20 World Cup 2021: टीम इंडिया विरुद्ध विजयाचा शिल्पकार, ऑस्ट्रेलिया विरुद्ध ठरला पराभवास कारणीभूत, शाहीनला गर्व नडला?

सेमीफायनच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 5 विकेट्सनी मात देत विजय मिळवला आहे. यावेळी पाकिस्तानच्या शाहीनची एक ओव्हर पाकला महाग पडली आहे.

T20 World Cup 2021: टीम इंडिया विरुद्ध विजयाचा शिल्पकार, ऑस्ट्रेलिया विरुद्ध ठरला पराभवास कारणीभूत, शाहीनला गर्व नडला?
शाहीन आफ्रिदी
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 11:57 PM

दुबई : सेमीफायनलसारख्या (Semi final between Pakistan vs Australia) अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तान संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला आहे. अगदी हाता-तोंडाशी आलेला सामना पाकिस्तानने गमावला आहे. विशेष म्हणजे या पराभवात एक षटक पाकिस्तानला महाग पडलं आहे. हे षटकं म्हणजे पाकिस्तानकडून टाकण्यात आलेलं 19 वं षटक. जे त्यांचा ‘स्टार’ गोलंदाज शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) टाकलं. शाहीनने या एका षटकात तब्बल 22 धावा देत सामना गमावला आहे. त्यामुळे भारताविरुद्ध सामन्यात विजयानंतर गर्वाच्या घरात राहणारा शाहीन आता जमिनीवर आला असावा.

सामन्यात पाकिस्तानने आधी 176 धावा केल्या ज्या पूर्ण करुन विजयासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात आला. वॉर्नरशिवाय वरची फळी सर्व पटापट बाद झाली. ज्यानंतर स्टॉयनिस आणि वेड यांनी अखेरच्या काही षटकात सामना जिंकवून दिला. पण तरी देखील 18 षटकानंतरही सामना पाककडेच होता. शेवटच्या 12 चेंडूत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 22 धावांची गरज होती. ज्यावेळी शाहीन गोलंदाजीला आला. सुरुवातीचे काही चेंडू ठिक गेल्यानंतर अखेरच्या 3 चेंडूवर मात्र मॅथ्यू वेडने दमदार षटकार ठोकत सामना एक ओव्हर राखून ऑस्ट्रेलियाला जिंकवून दिला. यावेळी हसन अलीने मॅथ्यूचा एक झेल सोडला देखील पण तरी त्यानंतरच्या सर्व चेंडू शाहीनला सिक्स खावे लागल्याने पाकचा पराभव झाला.

भारतीय फलंदाजांची उडवली होती खिल्ली

आफ्रिदीने भारताविरुद्धच्या सामन्यात महत्त्वाचे 3 विकेट्स घेतले होते. सर्वात आधी शून्य धावांवर खेळणाऱ्या रोहितला, पाठोपाठ 3 धावांवर खेळणाऱ्या केएल राहुलला आणि अखेर विराटला बाद करत महत्त्वाचे विकेट आफ्रिदीने टीपले. त्यानंतर आता शाहीनने एका विश्वचषकाच्या सामन्यात भारतीय फलंदाजांची खिल्ली उडवल्याचा व्हिडीओही समोर आला होता. या व्हिडीओमध्ये सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या शाहीनला पाकिस्तानी फॅन्स विराट, रोहित कसे बाद झाले असं मिश्किलपणे विचारत आहेत. तेव्हा शाहीन नकल करत ते कसे बाद झाले हे दाखवत आहे. हा व्हिडीओ बराच व्हायरल देखील झाला होता. पण आता या पराभवानंतर याच व्हिडीओतील फोटो टाकून नेटकरी शाहीनला ट्रोल करत आहेत.

सामन्याचा लेखा-जोखा

सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर पाकचे सलामीवीर बाबर आणि रिजवान यांनी चांगली सुरुवात केली. 70 हून अधिक धावांची भागिदारी होताच, बाबर 39 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर रिजवान आणि फखरनं डाव सांभाळला. पाकला सामन्यात मोहम्मद रिजवानच्या अर्धशतकाने चांगली सुरुवात करु दिली. पण खरी फिनिशींग फखरच्या अर्धशतकानेच दिली. विशेष म्हणजे फखरचं अर्धशतक हे तुफानी ठरलं कारण पहिल्या 17 चेंडूत त्याने केवळ 17 रन केले. पण अखेरच्या काही षटकात त्याने गिअर वाढवत तुफान खेळी केली. मिचेल स्टार्कच्या 2 ओव्हरमध्ये तीन षटकार ठोकत 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. शेवटच्या 15 चेंडूत फखरने 38 धावा केल्या. रिजवानने 52 चेंडूत 67 धावांची तर फखर जमानने 32 चेंडूत 55 धावांची खेळी केली. ज्याच्या जोरावर पाकने 176 धावांपर्यंत मजल मारली.

177 धावांचे खमके आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात अतिशय खराब झाली. कर्णधार शून्यावर बाद झाला. ज्यानंतर वॉर्नर आणि मार्शने सामना सांभाळण्याचा प्रय्तन केला पण मार्श 28 धावा करुन तंबूत परतला. ज्यानंतर स्मिथ, मॅक्सेव 5,7 धावा करुन बाद झाले. त्याच काही ओव्हर्समध्ये सामना सांभाळणारा वॉर्नरी 49 धावा करुन बाद झाला. निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर मात्र क्रिजवर आलेल्या मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेड यांनी तुफान फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला 5 गडी आणि एक ओव्हर राखून विजय मिळवून दिला. शाहीन आफ्रिदीच्या 19 व्या षटकात वेडने लागोपाठ 3 सिक्स मारुन सामना जिंकवला. यावेळी मार्कसने नाबाद 40 आणि मॅथ्यूने नाबाद 41 धावांची खेळी केली.

इतर बातम्या

T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहम्मद रिजवानचं अर्धशतक, 1000 धावा करत रचला इतिहास

England vs New Zealand T20 world cup Result: चुरशीच्या सामन्यात न्यूझीलंडची इंग्लंडवर सरशी, 5 विकेट्सने मात देत मिळवली अंतिम सामन्यात जागा

विराट कोहलीच्या चिमुरडीला बलात्काराच्या धमक्या देणारा ताब्यात, मुंबई पोलिसांची हैद्राबादमध्ये कारवाई, आरोपी आहे IIT पासआऊट

(Pakistan lost match against Australia due to Shaheen Afridis bad over)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.