AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : सोने पे सुहागा, पाकच्या बोलरकडून दोन टप्प्यांचा बॉल, वॉर्नरने स्टेडियमबाहेर भिरकावला, फ्री हिटही मिळाली!

T-20 विश्वचषकात गुरुवारी (11 नोव्हेंबर) पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 176 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजीसाठी जेव्हा मैदानावर उतरला तेव्हा मैदानावर असे काही घडले की सगळेच थक्क झाले. पाकिस्तानच्या गोलंदाजाने दोन टप्प्याचा बॉल टाकला आणि डेव्हिड वॉर्नरने त्यावरही षटकार ठोकला.

Video : सोने पे सुहागा, पाकच्या बोलरकडून दोन टप्प्यांचा बॉल, वॉर्नरने स्टेडियमबाहेर भिरकावला, फ्री हिटही मिळाली!
t20 WC Bouble Bouncer Ball
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 7:39 AM
Share

T20 WC Pak vs Aus | विश्वचषकात (T20 World Cup 2021) फॉर्ममध्ये असलेल्या पाकिस्तानच्या हातातील विजय ऑस्ट्रेलियाने हिसकावून घेतला. सेमीफायनलच्या सामन्यात 5 विकेट्सनी पराभूत होत पाकिस्तान स्पर्धेबाहेर गेला. तर ऑस्ट्रेलियाने थेट अंतिम सामन्यात एन्ट्री मिळवली आहे. आता ऑस्ट्रेलियाचा सामना रविवारी (14 नोव्हेंबर) न्यूझीलंडशी (New zealand vs Australia) होणार आहे.

T-20 विश्वचषकात गुरुवारी (11 नोव्हेंबर) पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 176 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजीसाठी जेव्हा मैदानावर उतरला तेव्हा मैदानावर असे काही घडले की सगळेच थक्क झाले. पाकिस्तानच्या गोलंदाजाने दोन टप्प्याचा बॉल टाकला आणि डेव्हिड वॉर्नरने त्यावरही षटकार ठोकला.

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीच्या आठव्या षटकात मोहम्मद हाफिज पाकिस्तानसाठी गोलंदाजी करायला आला. तेव्हा त्याने पहिल्याच चेंडूत चूक केली. मोहम्मद हाफीजने चेंडू टाकला तेव्हा तो दोन टप्पे घेत फलंदाजापर्यंत पोहोचला. फलंदाजी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरनेही चाणाक्षपणा दाखवला आणि पुढे जात तोच चेंडू बाउंड्रीच्या बाहेर पोहोचवला.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

अंपायरने या चेंडूला नो-बॉल दिला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाला दोन टप्पे घेतलेल्या चेंडूवर 6 धावा मिळाल्या. पुढचा चेंडू फ्री-हिट होता, ज्यावर डेव्हिड वॉर्नरने दोन धावा घेतल्या. हे जवळजवळ पहिल्यांदाच घडले असावे, जिथे कुठल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन टप्पे असलेला चेंडू दिसला आणि त्यावरही षटकार ठोकला. तेही T-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलच्या सामन्यात.

मोहम्मद हाफिजने या षटकात एकूण 13 धावा दिल्या. विशेष म्हणजे या T-20 विश्वचषकात पाकिस्तानने एकूण 12 नो-बॉल टाकले, पण एकाही फ्री-हिटवर बाउंड्री होऊ दिली नाही.

अनेकदा असे घडते की चेंडू टाकताना चेंडू चुकतो, जर चेंडूने अधिक टप्पे घेतले तर त्याला डेड बॉल घोषित केले जाते. मात्र, यावेळी चेंडू खेळपट्टीवरच पडला होता आणि दोन टप्पे होता, त्याचा फायदा डेव्हिड वॉर्नरने घेतला.

संबंधित बातम्या :

T20 World Cup 2021: टीम इंडिया विरुद्ध विजयाचा शिल्पकार, ऑस्ट्रेलिया विरुद्ध ठरला पराभवास कारणीभूत, शाहीनला गर्व नडला?

Australia vs Pakistan: 6,6,6,6,4,4,4…फखर जमान नावाचं वादळ, 15 चेंडूत पलटला खेळ

T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहम्मद रिजवानचं अर्धशतक, 1000 धावा करत रचला इतिहास

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.