
टीम इंडियाने न्यूझीलंडला सलग दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसरा झटका दिला आहे. अर्शदीपने डेव्हॉन कॉनव्हे याला पहिल्या ओव्हरमध्ये आऊट केलं. त्यानंतर हार्दिक पंड्या याने रचीन रवींद्र याला स्लीपमध्ये अभिषेक शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं.
अर्शदीप सिंह याने टीम इंडियाला पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात अप्रतिम अशी सुरुवात करुन दिली आहे. अर्शदीपने न्यूझीलंडला पहिल्याच ओव्हरमधील दुसऱ्याच बॉलवर झटका दिला आहे. अर्शदीपने डेव्हॉन कॉनव्हे याला विकेटकीपर संजू सॅमसन याच्या हाती कॅच आऊट केलं. कॉनव्हेला भोपळाही फोडता आला नाही.
टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर पहिल्या टी 20I सामन्यात 239 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 238 धावा केल्या. भारतासाठी अभिषेक शर्मा याने सर्वाधिक 84 धावा केल्या. तर अखेरच्या क्षणी रिंकू सिंह याने फिनिशिंग टच दिला. रिंकूने 20 बॉलमध्ये 44 धावा केल्या. तसेच इतर फलंदाजांनीही भारताला या धावसंख्येपर्यंत पोहचवण्यात योगदान दिलं. न्यूझीलंडसाठी जेकब डफी आणि कायल जेमीसन या जोडीने सर्वाधिक आणि प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.
न्यूझीलंडने भारताला सहावा झटका दिला आहे. भारताचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला. हार्दिकने 16 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 3 फोरसह 25 रन्स केल्या.
टीम इंडियाचा डावखुरा ऑलराउंडर शिवम दुबे आऊट झाला आहे. कायल जेमिसन याने त्याच्याच बॉलिंगवर शिवम दुबे याला कॅच आऊट केलं आहे. दुबे 4 बॉलमध्ये 9 रन्स करुन आऊट झाला.
भारताने चौथी आणि मोठी विकेट गमावली आहे. भारताचा सेट फलंदाज अभिषेक शर्मा आऊट झाला आहे. अभिषेकने 35 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 5 फोरसह 84 रन्स केल्या.
टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. भारताने मोठी विकेट गमावली आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव आऊट झाला आहे. सूर्याने 22 बॉलमध्ये 32 रन्स केल्या.
भारताने न्यूझीलंड विरुद्ध 10 ओव्हरमध्ये 11.70 च्या रन रेटने 117 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा ही जोडी नाबाद खेळत आहे. सूर्यकुमार यादव 31 आणि अभिषेक शर्मा 60 धावांवर नाबाद खेळत आहेत.
टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा याने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. तसेच दुसऱ्या बाजूने कर्णधार सूर्यकुमार यादव हा देखील फटकेबाजी करत आहे. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे. आता ही जोडी भारतासाठी आणखी किती धावा जोडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडियाने संजू सॅमसन आणि इशान किशन या दोघांच्या रुपात 2 विकेट्स गमावल्या. त्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा या जोडीने भारताचा डाव सावरला आहे. दोघेही दोन्ही बाजूने फटकेबाजी करत आहेत. त्यामुळेया दोघांकडून भारताला अशाच मोठ्या भागीदारीची अपेक्षा आहे.
भारताने दुसरी विकेट गमावली आहे. इशान किशन कमबॅकच्या सामन्यात आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला आहे. इशान किशन अवघ्या 8 धावा करुन माघारी परतला आहे.
न्यूझीलंडने भारताला पहिल झटका दिला आहे. भारताचा ओपनर संजू सॅमसन आउट झाला आहे. संजूने 7 बॉलमध्ये 2 फोरसह 10 रन्स केल्या.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी 20i सामन्याला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडने या सामन्यात टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. आता टीम इंडिया या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध किती धावा करते हे पहिल्या डावानंतर स्पष्ट होईल.
न्यूझलंड प्लेइंग ईलेव्हन : टिम रॉबिन्सन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर (कर्णधार), क्रिस्टियन क्लार्क, कायल जेमिसन, ईश सोढी आणि जेकब डफी.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग.
न्यूझीलंडने टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या टी 20I सामन्यात टॉस जिंकला आहे. न्यूझीलंडने व्हीसीएच्या स्टेडियममध्ये फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं आहे.
तिलक वर्मा याला दुखापतीमुळे पहिल्या 3 टी 20i सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे तिलकच्या जागी श्रेयस अय्यर याचा पहिल्या 3 सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. तर सुंदरला दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर व्हावं लागल्याने त्याच्या जागी फिरकीपटू रवी बिश्नोई याला संधी देण्यात आली आहे.
विकेटकीपर फलंदाज इशान किशन पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनचा भाग असणार आहे. इशानचं यासह 2 वर्षांनंतर प्लेइंग ईलेव्हनमध्ये कमबॅक झालं आहे. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने 20 जानेवारीला याबाबतची माहिती दिली होती.
भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टी 20i सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. पहिला सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईल-लॅपटॉपवर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.
मिचेल सँटनर (कॅप्टन), फिन एलन, मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमॅन, क्रिस्टियन क्लार्क, डेव्हॉन कॉनव्हे, लॉकी फर्ग्यूसन, बेन लिस्टर, डॅरेल मिचेल, एडम मिल्ने, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टीम सायफर्ट, ईश सोढी आणि विल यंग.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रिंकू सिंह, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकप्तान), रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकीपर) आणि वरुण चक्रवर्ती.
टीम इंडिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांची आगामी वर्ल्ड कप स्पर्धेआधीची ही शेवटची टी 20i मालिका आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. उभयसंघात एकूण 5 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी 20i सामन्याचं आयोजन हे नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिशएशनच्या स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. दोन्ही संघांचा हा 2026 मधील पहिलाच टी 20i सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा नववर्षातील पहिलाच सामना जिंकून विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या सामन्यात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. सूर्यकुमार यादव याच्याकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर मिचेल सँटनर न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. या सामन्यातील प्रत्येक घडामोडीबाबत आपण या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.