
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील साखळी फेरीत भारताने जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या सामन्यात बांगलादेशला आणि आता पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 242 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 42.3 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. भारताकडून विराट कोहलीने 111 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 56 आणि शुबमन गिलने 46 धावा केल्या. शाहीन आफ्रिदीने 2 विकेट घेतल्या. अबरार अहमद आणि खुसदिल शाह यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील 51 वे शतक ठोकलं. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील हे त्याचे पहिले शतक होते. 2023 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीनंतर कोहलीने पहिले एकदिवसीय शतक झळकावले.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. या सामन्यात विराट कोहलीने नाबाद शतकी खेळी केली. यासह भारताने उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतावरील टेन्शन कमी झालं आहे. तर पाकिस्तानचं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. या विजयासह भारताचं उपांत्य फेरीतील स्थान पक्क झालं आहे.
टीम इंडियाने तिसरी विकेट गमावली आहे. इमाम उल हक याने अप्रतिम कॅच घेत श्रेयस अय्यर याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. श्रेयसने 67 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्ससह 56 धावा केल्या.
टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध 36 षटकांमध्ये 2 विकेट्स गमावून 200 धावा पूर्ण केल्या आहेत. भारताला विजयासाठी आता आणखी 42 धावांची गरज आहे.
विराट कोहलीने 27 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर फोर ठोकत अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराटच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे 50 वं अर्धशतक ठरलंय.
टीम इंडियाने दुसरी विकेट गमावली आहे. उपकर्णधार शुबमन गिल 46 धावा करुन आऊट झाला आहे. अब्रार अहमद याने शुबमनला क्लिन बोल्ड केलं. अब्रारने टाकेलला बॉल पाहून विराट कोहलीही चकित राहिला.
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 14 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. विराटने 287 डावात ही कामगिरी केली. विराटने 13 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर सिंगल घेत 14 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.
टीम इंडियाने 10 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 64 धावा केल्या आहेत. उपकर्णधार शुबमन गिल 35 आणि विराट कोहली 6 धावांवर नाबाद खेळत आहेत. तर त्याआधी कर्णधार रोहित शर्मा 20 धावा करुन माघारी परतला.
पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहीन शाह अफ्रिदी याने टीम इंडियाला मोठा झटका दिला आहे. शाहीनने कर्णधार रोहित शर्मा याला पाचव्या ओव्हरमधील सहाव्या बॉलवर क्लिन बोल्ड केलंय. रोहितने 15 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 3 फोरसह 20 रन्स केल्या.
कर्णधार रोहित शर्मा याने दुसऱ्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर नसीम शाह याला कडक सिक्स ठोकला आहे. टीम इंडियाच्या डावातील हा पहिला सिक्स ठरला आहे.
टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुबमन गिली ही सलामी जोडी मैदानात आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 242 धावांचं आव्हान दिलं आहे.
पाकिस्तानने 49.4 षटकात सर्व गडी गमवून 241 धावा केल्या आणि विजयासाठी 242 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान भारतासाठी वाटते तितकं सोपं नाही. कारण या खेळपट्टी चेंडू खूपच संथ गतीने येत आहे. त्यामुळे आक्रमक फटकेबाजी करणं कठीण होतं.
पाकिस्तानला नसीम शाहच्या रुपाने आठवा धक्का बसला आहे. कुलदीप यादवने आपल्या स्पेलमध्ये तिसरी विकेट घेतली.
सलमान अघा आणि शाहीन आफ्रिदी या दोघांना बाद करत कुलदीप यादवने पाकिस्तानला बॅकफूटवर ढकललं. पण हॅटट्रीक घेण्याची संधी हुकली.
पाकिस्तानला सलमान अघाच्या रुपाने सहावा धक्का बसला आहे. 19 धावांवर असताना कुलदीपने त्याला बाद केलं.
पाकिस्तानला तय्यब ताहीरच्या रुपाने पाचवा धक्का बसला आहे. पाचव्या विकेटमुळे पाकिस्तानच्या धावगतीला ब्रेक मिळाला.
पाकिस्तानला चौथा धक्का बसला. हार्दिक पांड्याने सेट बॅट्समन सउद शकील चालतं केलं. त्याने 66 धावा केल्या आणि बाद झाला.
मोहम्मद रिझवान 77 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. अक्षर पटेलने त्याला क्लिन बोल्ड केलं.
मोहम्मद रिझवान आणि सउद शकील यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. तिसऱ्या विकेटसाठी या दोघांची शतकीय भागीदारी केली.
सउद शकील आणि मोहम्मद रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी 90 हून अधिक धावांची भागीदारी केली. पाकिस्तानच्या 31 षटकात 2 गडी गमवून 137 धावा झाल्या आहेत. तर सउद शकीलने अर्धशतक ठोकलं आहे.
मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांच्यात 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी झाली आहे. या दोन्ही खेळाडूंनी पाकिस्तानी संघाला अडचणीतून बाहेर काढले आहे.
पाकिस्तानचा खेळ खूपच स्लो सुरु असल्याचं दिसत आहे. 25 षटकात पाकिस्तानने 2 गडी गमवून 99 धावा केल्या. यात मोहम्मद रिझवानने 24, तर सउद शकीलने 29 धावा केल्या.
पाकिस्तान संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवान आणि सौद शकील सध्या संथ धावगतीने फलंदाजी करत आहेत.
पाकिस्तानने 15 षटकात 2 गडी गमवून 63 धावा केल्या आहेत. सउद शकील नाबाद 8 , मोहम्मद रिझवान नाबाद 8 धावांवर खेळत आहे.
टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, शमी परतला आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. तसेच एक षटक टाकले आणि फक्त 3 धावा दिल्या.
10 षटकांनंतर पाकिस्तान संघाने 2 विकेट गमावून 52 धावा केल्या आहेत. मोहम्मद रिझवान 4 धावांसह आणि सौद शकील 3 धावांसह खेळत आहेत.
इमाम उल हकच्या रुपाने पाकिस्तानला दुसरा धक्का बसला आहे. इमाम उल हकने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण अक्षर पटेलने जबरदस्त फिल्डिंग आणि थ्रो करत त्याला धावचीत केलं.
हार्दिक पांड्याने भारताला पहिलं यश मिळवून दिलं आहे. बाबर आझमला 23 धावांवर तंबूत पाठवलं.
मोहम्मद शमीला गोलंदाजी करण्यात थोडी अडचण येत असल्याचे दिसून आले. या कारणास्तव त्याने मैदान सोडले आहे.
परंडा : माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यात बाबर आझमने एक खास टप्पा गाठला आहे. त्याने आयसीसी स्पर्धेत 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. तथापि, आयसीसी स्पर्धांमध्ये बाबरची कामगिरी काही खास राहिलेली नाही.
टीम इंडिया या सामन्यात अपेक्षित सुरुवात करु शकली नाही. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने सामन्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये 5 वाईड बॉल टाकले. शमीने पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा दिल्या. त्यानंतर हर्षित राणा याने दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 धावा दिल्या. तर तिसऱ्या ओव्हरमध्ये शमीने 4 धावा दिल्या. त्यामुळे आता टीम इंडिया पहिल्या विकेटच्या शोधात आहे.
पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामन्याला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानकडून बाबर आझम आणि इमाम उल हक ही सलामी जोडी मैदानात आली आहे. तर मोहम्मद शमी पहिली ओव्हर टाकत आहे.
काही फरक पडत नाही, असं कर्णधार रोहित शर्मा याने टॉस गमावल्यानंतर म्हटलं. आम्हाला फिल्डिंग करायची होती, असं हिटमॅनने स्पष्ट केलं.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), इमाम उल हक, बाबर आझम, सौद शकील, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि अबरार अहमद.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
पाकिस्तानने टॉस जिंकला आहे. पाकिस्तानने टॉस जिंकून टीम इंडियाविरुग्ध बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. पाकिस्ताने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. फखर झमान याच्या जागी इमाम उल हक याचा समावेश करण्यात आला आहे. तर टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदले केलेला नाही.
आमदार सुरेश धस यांनी भूम परंडा वाशीचे स्वर्गीय माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार होते. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित पाटील यांची सुरेश धस यांनी भेट घेतली आहे. रणजित पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन झाले होते. सांत्वनपर आमदार सुरेश धस यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूपमध्ये बारावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विनायक नागनाथ कुंभार असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याने आत्महत्या का केली याचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. मंद्रूपमधील लोकसेवा महाविद्यालयात वाणिज्य शाखेत हा विद्यार्थी शिकत होता. बारावीचे आत्तापर्यंत चार पेपर दिल्यानंतर विद्यार्थ्याने अचानक आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला. या घटनेची मंद्रूप पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
टीम इंडिया दुबईत वनडे फॉर्मेटमध्ये अजिंक्य आहे. टीम इंडियाने इथे एकूण 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत. भारताने त्यापैकी 6 सामने जिंकले आहेत. तर 1 मॅच टाय राहिली आहे. टीम इंडिया आता दुबईत सातवा विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 135 वेळा आमनेसामने आले आहेत. या फॉर्मेटमध्ये पाकिस्तानचा दबदबा पाहायला मिळत आहे. पाकिस्तानने 135 पैकी 73 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर भारताने 57 सामन्यांमध्ये पलटवार करत विजय मिळवलाय.
साऱ्या क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्याची प्रतिक्षा आहे. या सामन्याला अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळणार आहे. तसेच जिओ-हॉटस्टार एपद्वारे मोबाईलवर लाईव्ह सामन्याचा थरार अनुभवता येणार आहे.