India vs Pakistan live Score : पाकिस्तान एला दुसरा धक्का; हर्षित राणाने मिळवून दिले भारताला यश!

India vs Pakistan live Score Asia Cup Rising Stars 2026 in Marathi : आपल्या पहिल्या सामन्यात, इंडिया 'ए' संघाने नेपाळला 26 धावांत सर्वबाद केले आणि 306 धावांनी मोठा विजय मिळवला. दुसरीकडे, पाकिस्तान 'ए' संघाने संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) पराभव केला.

India vs Pakistan live Score : पाकिस्तान एला दुसरा धक्का; हर्षित राणाने मिळवून दिले भारताला यश!
India vs Pakistan LIVE
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 22, 2026 | 4:35 PM

LIVE NEWS & UPDATES

  • 22 Nov 2026 04:26 PM (IST)

    India vs Pakistan live Score: भारताला मिळालं दुसरं विकेट

    पाकिस्तान एला दुसरा धक्का; हर्षित राणाने रोहेल नझीरला LBW करत माघारी धाडले!

  • 22 Nov 2026 04:20 PM (IST)

    India vs Pakistan live Score : भारताला मिळाली पहिली विकेट

    वेगवान सुरुवातीनंतर, पाकिस्तान संघाला पहिला धक्का बसला आहे. आठव्या षटकात फिरकीपटू आयुष बदोनीने सलामीवीर शामिल हुसेनला 33 धावांवर झेलबाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले.


  • 22 Nov 2026 04:13 PM (IST)

    India vs Pakistan live Score : वैभव सूर्यवंशी-विप्रज निगमची जोरदार धडक

    India vs Pakistan live Score : बाउंड्रीवर चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात वैभव सूर्यवंशी-विप्रज निगमची जोरदार धडक; दोघेही मैदानात परतले

अंडर19 आशिया कपच्या अंतिम सामन्यानंतर, भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने आले आहेत. यावेळी ‘आशिया कप रायझिंग स्टार्स 2026’ मध्ये भारत ‘अ’ (India A) आणि पाकिस्तान ‘अ’ (Pakistan A) संघ एकमेकांशी भिडले आहेत. पाकिस्तान ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ‘गट ब’ (Group B) मध्ये असलेल्या या दोन्ही संघांनी आपापल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेची सुरुवात केली आहे. भारत ‘अ’ संघाने आपल्या पहिल्या सामन्यात नेपाळचा 306 धावांनी पराभव केला, तर पाकिस्तान ‘अ’ संघाने संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध 61 धावांनी विजय मिळवला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us