INDW vs PAKW Live: पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय
India vs Pakistan Live Score, Womens Asia Cup 2026: वुमन्स आशिया कप 2026 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्याने या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
IND W vs PAK W Live Update: भारताची प्लेइंग 11
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाली, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, नंदनी शर्मा, श्री चरणी, क्रांती गौड.
-
IND W vs PAK W Live Update: पाकिस्तानची प्लेइंग 11
पाकिस्तान महिला (प्लेइंग इलेव्हन): मुनीबा अली (विकेटकीपर), शवाल जुल्फिकार, गुल फिरोजा, आयेशा जफर, सदफ शमास, फातिमा सना (कर्णधार), उम्म-ए-हानी, आयमान फातिमा, तुबा हसन, नशरा संधू, सादिया इक्बाल
-
-
IND W vs PAK W Live Update: काय म्हणाली कर्णधार हरमनप्रीत कौर
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने कौल गमावल्याने वाटेला प्रथम गोलंदाजी आली आहे. या निर्णयावर कौर म्हणाली की, आम्हाला पाठलाग करण्याची संधी मिळत आहे, हे चांगलं आहे. कर्णधार म्हणून 150वा टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणे ही एक मोठी उपलब्धी आहे, महत्त्वाचे म्हणजे खेळाचा आनंद घेत राहणे. आम्ही त्यांना कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करू. आम्ही तोच संघ घेऊन मैदानात उतरणार आहोत.
-
IND W vs PAK W Live Update: काय म्हणाली पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना?
पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना म्हणाली की, आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत कारण आम्हाला येथे जास्तीत जास्त धावसंख्या उभारायची आहे. आमची गोलंदाजी चांगली आहे आणि आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. आम्हाला फक्त खेळपट्टीनुसार खेळायचे आहे. आमचा संघ तोच आहे.
-
IND W vs PAK W Live Update: नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने, प्रथम फलंदाजीला प्राधान्य
नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला असून प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यामुळे पाकिस्तानला कमी धावांवर रोखण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. तसेच दिलेल्या धावा पूर्ण करून विजयी पताका फडकवण्याचा मानस आहे.
-
-
IND W vs PAK W Live Update: नाणेफेकीचा कौल थोड्याच वेळात होणार
महिला टी20 आशिया कप 2026 मध्ये आज भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर उभे ठाकतील. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रात्री 8.00 वाजता सुरू होईल. नाणेफेक सायंकाळी 7.30 वाजता होईल. कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौर हा 150 वा सामना खेळत आहे.
वुमन्स आशिया कप 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होत आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. कारण भारताने या गटात दोन सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आहे.