भारत-पाकिस्तान सामन्यावर प्रेमानंद महाराजांची मोठी भविष्यवाणी काय? कोण पडणार भारी?

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर संत प्रेमानंद महाराजांनी आपलं मत मांडलं आहे. एका भक्ताने त्यांच्याकडे सामन्याच्या निकालासंबंधी विचारणा केसी. त्यावेळी महाराजांनी स्पष्टपणे कोणत्याही संघाच्या विजयाचं भाकीत केलं नाही. त्यांनी क्रिकेटमध्ये अभ्यासाचं महत्त्व अधोरेखित केलं आणि खेळातील अनिश्चिततेवर भर दिला.

भारत-पाकिस्तान सामन्यावर प्रेमानंद महाराजांची मोठी भविष्यवाणी काय? कोण पडणार भारी?
Premanand Maharaj ind pak
| Updated on: Feb 23, 2025 | 3:36 PM

भारत-पाकिस्तान दरम्यानच्या महामुकाबल्यावर संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. कोण जिंकणार? यावर क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. खेळाडू आणि आकडेवारींचा हवाला देत अनेकजण आपला मनपसंत संघ कसा विजयी होईल याचं गणित मांडताना दिसत आहेत. काहीजण भाकीत वर्तवत आहेत, तर काहीजण पैज लावत आहे. या सामन्यापूर्वी अनेकांनी भविष्यवाणी वर्तवली होती. आयआयटीवाले बाबा अभय सिंह यांनी तर या महामुकाबल्यात पाकिस्तानच विजयी होणार असल्याचं भाकीत वर्तवून मीडियाचं लक्ष वेधलं होतं. आता संत प्रेमानंद महाराज यांनीही भविष्यवाणी वर्तवली आहे. आयआयटीवाले बाबा नंतर अभय सिंह यांच्या भविष्यवाणीची जोरदार चर्चा सुरू आहे.

संत प्रेमानंद महाराज यांचं नेहमीप्रमाणेच सत्संग सुरू होतं. यावेळी ते प्रवचन देत असताना एका श्रद्धाळूने त्यांना थेट भारत-पाकिस्तान सामन्यावर प्रश्न केला. भारतीय संघ पाकिस्तानी संघाला कसा हरवू शकतो? असा सवाल या भक्ताने केला. भारत जिंकावा म्हणून देशभरात होम हवन केला जात आहे. पूजापाठ केले जात आहेत. जर भारत हरला तर क्रिकेटप्रेमींमध्ये नैराश्य येईल. अनेकांच्या आस्थेचा हा प्रश्न आहे, असं या भाविकाने म्हटलं.

काय म्हणाले महाराज?

या भक्ताचा प्रश्न ऐकून प्रेमानंद महाराज यांनी स्मित हास्य केलं. म्हणाले, अशा तऱ्हेच्या प्रकरणात अभ्यास असणं महत्त्वाचं आहे. क्रिकेटच्या खेळात भक्तीचा उपयोग करून उपहास करता येत नाही. जर अभ्यास महत्त्वाचा नसता तर खुद्द देवानेही अभ्यासाचं महत्त्व अधोरेखित केलं नसतं, असं प्रेमानंद महाराज यांनी सांगितलं. खेळ हा खेळ असतो. त्यात हारजीत होत असते. सुरुवातीपासून माणसाला वाटतं आपण जिंकू. आपली बाजू मजबूत असते. पण जेव्हा मैदानात उतरतो, तेव्हा अशी काही परिस्थिती बदलते की आपल्या हातून सर्वच जातं. हे सर्वांच्याच बाबत घडतं. त्यामुळे अशा कधीही बदलू शकणाऱ्या गोष्टींवर भाकीत करता येत नाही, असंच प्रेमानंद महाराजांना सांगायचं आहे. त्यामुळे त्यांनी भारत-पाकिस्तान मॅचवर काहीच थेट भाष्य केलं नाही.

दरम्यान, आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पार पडत आहे. 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील हायव्होल्टेज सामना दुबईत खेळला जाणार आहे. अनेक महिन्यानंतर भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असतील. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. भारत – पाकिस्तान या सामन्याकडे आशिया खंडासह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. पाकिस्तानसाठी हा सामना एखाद्या नॉकआउट सामन्यापेक्षा कमी नाही, भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजल्यापासून तुम्ही भारत आणि पाकिस्तानमधील सामना पाहू शकता.

भारतीय संघ

  • रोहित शर्मा (कर्णधार)
  • शुबमन गिल (उपकर्णधार)
  • विराट कोहली
  • श्रेयस अय्यर
  • केएल राहुल (विकेटकीपर)
  • ऋषभ पंत (विकेटकीपर)
  • हार्दिक पंड्या
  • अक्षर पटेल
  • वॉशिंग्टन सुंदर
  • कुलदीप यादव
  • मोहम्मद शमी
  • अर्शदीप सिंग
  • रवींद्र जडेजा
  • वरुण चक्रवर्ती

पाकिस्तानचा संघ

  • मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर)
  • बाबर आझम
  • कामरान गुलाम
  • सलमान आगा
  • तय्यब ताहीर
  • खुशदिल शाह
  • फहीम अश्रफ
  • शाहीन आफ्रिदी
  • नसीम शाह
  • अबरार अहमद
  • हारिस रौफ
  • मोहम्मद हसनैन
  • उस्मान खान
  • सौद शकील