IND Vs PAK : पाकिस्तानी खेळाडूंचा माज, वैभवला बाद करताच डिवचलं, ग्राऊंडवर वातावरण तापलं!

किस्तानी खेळाडू आणि वैभव यांच्यात शाब्दिक घडाजंगी पाहायला मिळाली. मैदानावरच मोठा वाद होण्याची शक्यता होती. परंतु अभिषेक शर्माने वेळीच हस्तक्षेप करत वैभवला रोखले.

IND Vs PAK : पाकिस्तानी खेळाडूंचा माज, वैभवला बाद करताच डिवचलं, ग्राऊंडवर वातावरण तापलं!
vaibhav suryavanshi and india vs pakistan match
Image Credit source: x
| Updated on: Nov 22, 2026 | 10:06 PM

India Vs Pakistan Match : सध्या आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत भारत ए आणि पाकिस्तान ए यांच्यात सामना रंगलाय. पाकिस्तानने अगोदर फलंदाजी करत भारतापुढे तब्बल 313 धावांचे आव्हान उभे केले. या सामन्यात भारताचा स्टार क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. परंतु तो अवघ्या 11 धावाचा करू शकला. तो झेलबाद झाला. दरम्यान, वैभव बाद झाल्यानंतर मैदानावर चांगलाच ड्रामा रंगला. पाकिस्तानी खेळाडूंनी वैभवला डिवचण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

वैभव सूर्यवंशी भिडला, वाद चिघळला

वैभव सूर्यवंशीच्या विकेटनंतर मैदानावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. वैभव बाद झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी केलेल्या कथित शेरेबाजीमुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक वाद पाहायला मिळाली. मात्र, भारतीय संघाचा खेळाडू अभिषेक शर्माने वेळीच हस्तक्षेप केला. त्यामुळे हा वाद जास्त वाढला नाही.

Loading...

वैभव बाद झाल्यानंतर काय घडलं?

पाकिस्तान ए विरुद्धच्या ग्रुप बी सामन्यात वैभव सूर्यवंशीला मोठी खेळी करता आली नाही. त्याने 13 चेंडूंचा सामना करत दोन चौकारांच्या मदतीने 11 धावा केल्या. मोहम्मद इमरान रंधावाच्या गोलंदाजीवर वैभवने फटका मारण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे पाकिस्तानच्या अब्दुल समदने त्याचा झेल पकडला. वैभवची विकेट मिळताच पाकिस्तानी खेळाडूंनी मोठा जल्लोष केला. यावेळी काही पाकिस्तानी खेळाडूंनी वैभवला उद्देशून काहीतरी म्हटल्याचे दिसले. त्यामुळे पॅव्हेलियनच्या दिशेने जात असलेल्या वैभवने मागे वळून पाकिस्तानी खेळाडूंकडे पाहिले.

अभिषेक शर्माने वेळीच हस्तक्षेप केला

त्यानंतर पाकिस्तानी खेळाडू आणि वैभव यांच्यात शाब्दिक घडाजंगी पाहायला मिळाली. मैदानावरच मोठा वाद होण्याची शक्यता होती. परंतु अभिषेक शर्माने वेळीच हस्तक्षेप करत वैभवला रोखले. यावेळी पंचांनीही मध्यस्थी केली. त्यामुळे परिस्थिती निवळली.

दरम्यान, पाकिस्ताननेही भारतापुढे 313 दावा केल्या आहेत. भारताला हे आव्हान पेलणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वैभव फक्त 11 धावा करू शकला. तर अभिषेक शर्माने 70 धावा केल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us