AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs IND : एक वेळच नाही, तिसऱ्या टी20I सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

South Africa vs India 3rd T20i Live Streaming : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांची मालिका ही 1-1 ने बरोबरीत होणार आहे. त्यामुळे हा तिसरा सामना जिंकून कोण आघाडी घेणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

SA vs IND : एक वेळच नाही, तिसऱ्या टी20I सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
sanju samson sa vs ind t20iImage Credit source: ProteasMenCSA X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Nov 12, 2024 | 6:38 PM
Share

टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. ही मालिका 1-1 बरोबरीत आहे. टीम इंडियाने मालिकेत विजयी सलामी देत 1-0 ने आघाडी घेतली. भारताचा हा टी 20i मधील सलग 11 वा विजय ठरला. टीम इंडियाला रविवारी 10 नोव्हेंबरला दुसरा सामना जिंकण्याची संधी होती. मात्र कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या चुकीच्या निर्णयामुळे भारताला पराभूत व्हावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह भारताचा विजयी रथ रोखला आणि मालिकेत बरोबरी साधली. आता तिसऱ्या सामन्यनाकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा सामना केव्हा?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा सामना बुधवारी 13 नोव्हेंबरला होणार आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा सामना कुठे?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा सामना सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन येथे होणार आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 8 वाजता टॉस होणार आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर लाईव्ह मॅच पाहता येईल.

दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, अवेश खान आणि यश दयाल.

T20I सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, न्काबा पीटर, रायन सिमलेटन, रायन रिकेल लुथो सिपमला (तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी) आणि ट्रिस्टन स्टब्स.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...