AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: अजिंक्य रहाणे, पुजाराचं पुढे काय होणार? दोघांचाही पुढचा प्रवास खडतर

“करीअरच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर खेळाडूंबरोबर असं होतं. प्रत्येकाबरोबर असं होतं. तुम्हाला वाटतं, तुम्ही चांगली फलंदाजी करताय पण मोठी धावसंख्या होत नाही. या तिघांबरोबर सध्या असचं घडतय”

IND vs SA: अजिंक्य रहाणे, पुजाराचं पुढे काय होणार? दोघांचाही पुढचा प्रवास खडतर
| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 4:01 PM
Share

जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होण्याआधीपासूनच अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar pujara) फॉर्मबद्दल चर्चा सुरु होती. अजिंक्य रहाणेची कसोटी संघात निवड होईल का? असा अनेकांना प्रश्न पडला होता. पण निवड समितीने अनुभवाला प्राधान्य देत अजिंक्यची संघात निवड केली. पण अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा दोघांनाही निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाच्या विश्वासाला न्याय देता आलेला नाही. पहिल्या कसोटी प्रमाणे दुसऱ्या कसोटीतही त्यांनी निराशाजनक प्रदर्शन केलं आहे. (India vs South Africa Ajinnkya Rahane & cheteshwar pujaras Future Journey difficult)

महत्त्वाचं म्हणजे संघाला गरज असताना मोक्याच्या क्षणी त्यांना उपयुक्तता सिद्ध करण्याची संधी होती. पण दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये ते फेल गेले आहेत. पहिल्या कसोटीत अजिंक्यने दोन्ही डावात मिळून 68 तर पुजाराने फक्त 16 धावा केल्या होत्या. आज जोहान्सबर्ग कसोटीत मयंक बाद झाल्यानंतर पुजारा अवघ्या तीन धावांवर बाद झाला तर रहाणेला भोपाळाही फोडता आला नाही. दोघांना डुआन ओलिवरने आल्यापावली पॅव्हेलियनमध्ये धाडले. काल हेड कोच राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत दोघांची पाठराखण केली होती.

राहुल द्रविड काय म्हणाले होते? “करीअरच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर खेळाडूंबरोबर असं होतं. प्रत्येकाबरोबर असं होतं. तुम्हाला वाटतं, तुम्ही चांगली फलंदाजी करताय पण मोठी धावसंख्या होत नाही. या तिघांबरोबर सध्या असचं घडतय” असं राहुल द्रविड रविवारच्या पत्रकार परिषदेत म्हणाले. “एक चांगली गोष्ट आहे, ते चांगले टचमध्ये दिसतायत. चांगल्या सुरुवातीला मोठ्या खेळीमध्ये कसं बदलायचं, हे त्यांना माहित आहे. काळजी हा शब्द मला योग्य वाटत नाही. जेवढं शक्य आहे, तेवढं ते चांगल करतायत” असं राहुल द्रविड यांनी सांगितलं.

आता फक्त दुसऱ्या डावात संधी? अजिंक्य आणि पुजारा दोघे दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात सपशेल अपयशी ठरले आहेत. आता दुसऱ्या डावात फलंदाजीची वेळ आली, तरच त्यांना काहीतरी करुन दाखवण्याची संधी आहे. दुसऱ्या डावातही खराब फॉर्म कायम राहिला, तर तिसऱ्या कसोटीत पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धुसर आहे आणि इथून पुढचा मार्गही खडतर असेल. कारण या दोघांना संघात घेऊ नका, अशी अनेकजण आधीपासून मागणी करत आहेत. या दोघांऐवजी उदयोन्मुख खेळाडूंना संधी देण्याची मागणी होत आहे. या दौऱ्याआधी रहाणेने दक्षिण आफ्रिकेत 53 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या दोन दौऱ्यात तीन कसोटी सामने खेळले आहेत. दोन अर्धशतकासह 266 धावा केल्या आहेत.

संबंधित बातम्या: 

उभ्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणारे एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंची अखेर बदली पोलिसांना शिवीगाळ करणं भोवलं, भंडाऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांना अटक मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय, किती तारखेपर्यंत बंद राहणार शाळा? वाचा सविस्तर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.