India vs South Africa LIVE Score, 1st Test, DAY one: पहिला दिवस भारताचा, राहुलच्या शतकासह दिवसअखेर 3 बाद 273 धावांपर्यंत मजल

जे शक्य झालं नाही, ते शक्य करुन दाखवण्याचं टीम इंडियाचं लक्ष्य आहे. त्या दृष्टीनेच कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची तयारी सुरु आहे. विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सलग दुसऱ्यांदा संघाचे नेतृत्व करणार आहे.

India vs South Africa LIVE Score, 1st Test, DAY one: पहिला दिवस भारताचा, राहुलच्या शतकासह दिवसअखेर 3 बाद 273 धावांपर्यंत मजल
| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 10:37 PM

सेंच्युरियन : आजपासून सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. आज सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवीरांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. सलामीवीर के. एल. राहुल आणि मयंक अग्रवाल या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी करत मोठ्या धावसंख्येच्या पाया रचला.

लुंगी एंगिडीने 41 व्या षटकात मयंक अग्रवालला पायचित करुन सलामीची जोडी फोडली. मयंकने 60 धावांची खेळी केली. त्यापाठोपाठ एंगिडीने चेतेश्वर पुजाराला आल्या पावली माघारी धाडलं. पुजारा भोपळादेखील फोडू शकला नाही. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि राहुलने डाव सावरला. मात्र काही वेळातच भारताने विराट कोहलीच्या रुपात तिसरी विकेट गमावली. विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. चांगली सुरुवात होऊनही त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्याने 94 चेंडूत 35 धावांची खेळी केली. लुंगी एंगिडीने त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. विराट बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या अजिंक्य रहाणे आणि राहुलने पुढे पडझड होऊ दिली नाही.

दरम्यान, राहुलने त्याचं शतक पूर्ण केलं. 78 व्या षटकात केशव महाराजच्या गोलंदाजीवर लोकेश राहुलने शानदार चौकार वसूल करत आपलं शतक पूर्ण केलं. राहुलने 218 चेंडूत शतक केलं. त्यात 14 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. राहुल-अजिंक्य जोडी दिवसअखेर नाबाद परतली. राहुल सध्या 122 धावांवर खेळत आहे, तर अजिंक्य रहाणे 40 धावांवर खेळतोय.

दरम्यान, भारताचे तीनही फलंदाज लुंगी एंगिडीने बाद केले. त्याच्याव्यतिरिक्त साऊथ आफ्रिकेच्या कोणत्याही गोलंदाजाला यश मिळालं नाही. एंगिडीने 17 षटकात 45 धावात देत 3 बळी घेतले.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 26 Dec 2021 08:05 PM (IST)

    लोकेश राहुलचं शतक, भारत सुस्थितीत

    78 व्या षटकात केशव महाराजच्या गोलंदाजीवर लोकेश राहुलने शानदार चौकार वसूल करत आपलं शतक पूर्ण केलं. राहुलने 218 चेंडूत 103 धावांची खेळी साकारली आहे. त्यात 14 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. (भारत 240/3)

  • 26 Dec 2021 07:25 PM (IST)

    भारताला तिसरा धक्का, विराट कोहली पुन्हा अपयशी

    भारताने कर्णधार विराट कोहलीच्या रुपात तिसरी विकेट गमावली आहे. विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. चांगली सुरुवात होऊनही त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्याने 94 चेंडूत 35 धावांची खेळी केली. लुंगी एंगिडीने त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. (भारत – 199/3)

  • 26 Dec 2021 06:20 PM (IST)

    चहापानापर्यंत भारताची दीडशतकी मजल, राहुल-विराट क्रिझवर

    चहापानापर्यंत भारताने 57 षटकांमध्ये 2 बाद 157 धावांपर्यंत मजल मारली आहे. लोकेश राहुल 68 तर विराट कोहली 19 धावांवर खेळत आहे.

  • 26 Dec 2021 05:54 PM (IST)

    विराट खेळपट्टीवर स्थिरावला

    लागोपाठच्या दोन धक्क्यानंतर मैदानात आलेला कर्णधार विराट कोहली खेळपट्टीवर स्थिरावला असून राहुलसोबत मिळून डावाला आकार देण्याचा प्रयत्न करतोय. भारताच्या दोन बाद 144 धावा झाल्या असून राहुल (60) आणि विराट (14) धावांवर खेळत आहे.

  • 26 Dec 2021 05:44 PM (IST)

    भारताच्या दोन बाद 139 धावा

    केएल राहुल (58) आणि विराट कोहली (11) खेळपट्टीवर आहेत. भारताच्या दोन बाद 139 धावा झाल्या आहेत.

  • 26 Dec 2021 05:27 PM (IST)

    लागोपाठ दोन विकेट गेल्यानंतर केएल राहुलचं अर्धशतक

    चांगल्या सुरुवातीनंतर मयांक अग्रवाल (60) धावांवर बाद झाला. पाठोपाठ चेतेश्वर पूजाराने भोपळाही न फोडता तंबुची वाट धरली. निगीडीने या दोन्ही विकेट घेतल्या. आता कर्णधार विराट कोहली राहुल सोबत मैदानावर आहे. केएल राहुलने अर्धशतक झळकावले आहे. त्याने नऊ चौकार लगावले.

  • 26 Dec 2021 05:10 PM (IST)

    भारताला लागोपाठ दुसरा झटका, चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद

    मयांक अग्रवाल पाठोपाठ भारताला दुसरा झटका बसला आहे. चेतेश्वर पुजारा खातेही न उघडता शून्यावर बाद झाला आहे. निगीडीने त्याला पीटरसनकरवी झेलबाद केले.

  • 26 Dec 2021 05:06 PM (IST)

    भारताला पहिला झटका, मयांक अग्रवाल बाद

    दमदार सलामीनंतर भारताला पहिला झटका बसला आहे. अर्धशतक झळकावल्यानंतर मयांक अग्रवाल (60) धावांवर बाद झाला. त्याला निगीडीने पायचीत केले.

  • 26 Dec 2021 04:47 PM (IST)

    मयांक-राहुलची शतकी भागीदारी

    मयांक अग्रवाल आणि केएल राहुलमध्ये शतकी भागीदारी झाली आहे. सध्या भारताच्या बिनबाद 105 धावा झाल्या आहेत.

  • 26 Dec 2021 04:39 PM (IST)

    भारताचं शतक

    भारतीय सलामीवीरांनी 35 षटकात बिनबाद 101 धावा केल्या आहेत. मयंक अग्रवाल 56 तर के. एल. राहुल. 35 धावांवर खेळत आहेत.

  • 26 Dec 2021 04:18 PM (IST)

    मयंक अग्रवालचं अर्धशतक

    30 व्या षटकात मार्को यान्सिनला शानदार चौकार लगावत मयंक अग्रवालने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मयंकने 89 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. (भारत 91/0)

  • 26 Dec 2021 03:44 PM (IST)

    लंचला भारताच्या बिनबाद 83 धावा

    लंचला खेळ थांबला असून भारताच्या बिनबाद 83 धावा झाल्या आहेत. राहुल 29 आणि मयांक 46 धावांवर खेळत आहे.

  • 26 Dec 2021 03:29 PM (IST)

    भारताची दमदार सलामी

    भारताच्या 27 षटकाअखेरीस बिनबाद 82 धावा झाल्या आहेत. राहुलच्या 29 धावा झाल्या असून त्याने चार चौकार लगावले. मयांक 45 धावांवर खेळत असून त्याने सात चौकार लगावले आहेत.

  • 26 Dec 2021 03:14 PM (IST)

    भारताच्या बिनबाद 69 धावा

    22.3 षटकांचा खेळ झाला असून भारताच्या बिनबाद 69 धावा झाल्या आहेत. मयांक 43 आणि राहुल 22 धावांवर खेळत आहे.

  • 26 Dec 2021 02:57 PM (IST)

    भारताने ओलांडली अर्धशतकाची वेस

    दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने ओलांडला 50 धावांचा टप्पा, सलामीवीर मयांक 37 आणि राहुल 20 धावांवर खेळत आहे.

  • 26 Dec 2021 02:47 PM (IST)

    समर्थपणे केला आफ्रिकन गोलंदाजांचा सामना

    17 षटकात भारताच्या बिनबाद 44 धावा झाल्या आहेत. मयांक 28 आणि राहुल 16 धावांवर खेळत आहे. दोघेही दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी समर्थपणे खेळून काढत आहेत.

  • 26 Dec 2021 02:20 PM (IST)

    भारताच्या बिनबाद 35 धावा

    11 षटकांचा खेळ संपला असून भारताच्या बिनबाद 35 धावा झाल्या आहेत. राहुल 10 आणि मयांक 25 धावांवर खेळत आहे. राहुलने त्याच्या खेळीत एक चौकार तर मयांकने चार चौकार लगावले आहेत.

  • 26 Dec 2021 02:07 PM (IST)

    केएल राहुलने खातं उघडलं

    आठ षटकांचा खेळ पूर्ण झाला असून भारताच्या बिनबाद 16 धावा झाल्या आहेत. केएल राहुलने खातं उघडल असून त्याने पाच धावा केल्या आहेत. मयांक अग्रवाल 11 धावांवर खेळत असून त्याने एक चौकार लगावला आहे.

  • 26 Dec 2021 01:54 PM (IST)

    पाच षटकात भारताच्या बिनबाद 8 धावा

    आतापर्यंत पाच षटकांचा खेळ झाला असून भारताच्या बिनबाद आठ धावा झाल्या आहेत. राहुलला अजून खातं उघडता आलेलं नाही. मयांक अग्रवालने 8 रन्स केल्या आहेत.

  • 26 Dec 2021 01:41 PM (IST)

    भारताने खातं उघडलं

    भारताने खातं उघडलं आहे. लुंगी निगीडीच्या दुसऱ्या षटकात सलामीवीर मयांक अग्रवालने दोन धावा केल्या आहेत.

  • 26 Dec 2021 01:36 PM (IST)

    केएल राहुल-मयांक अग्रवालची जोडी मैदानात

    भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. केएल राहुल आणि मयांक अग्रवाल ही सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. कागिसो राबाडाने पहिले षटक निर्धाव टाकले आहे.

  • 26 Dec 2021 01:26 PM (IST)

    ट्रॉफीसह फोटो

    भारत-दक्षिण आफ्रिका कसोटीआधी दोन्ही संघाच्या कर्णधारांचा ट्रॉफीसह काढलेला फोटो.

  • 26 Dec 2021 01:17 PM (IST)

    भारताची प्लेइंग XI

    केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर. अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुर

  • 26 Dec 2021 01:15 PM (IST)

    विराट कोहलीने टॉस जिंकला

    भारताचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन डीन एल्गरने आमचा संघ कुठल्याही आव्हानासाठी सज्ज असल्याचं म्हटलं आहे.