World Cup 2025 : वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला संघाला TATA कडून स्पेशल गिफ्ट, खास काय?

भारतीय महिला क्रिकेट संघाने ५२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून इतिहास घडवला आहे. या ऐतिहासिक विजयाचा सन्मान करण्यासाठी टाटा मोटर्सने एक खास भेट जाहीर केली आहे.

World Cup 2025 : वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला संघाला TATA कडून स्पेशल गिफ्ट, खास काय?
Indian Women Cricket Team
| Updated on: Nov 06, 2025 | 9:42 AM

भारतीय महिला क्रिकेट संघाने २ नोव्हेंबर रोजी विश्वचषकाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी दणदणीत विजय मिळवून इतिहास रचला. ५२ वर्षांच्या विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय महिला संघाने आयसीसी (ICC) ट्रॉफीवर आपले नाव कोरले. त्यामुळे सध्या सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने भारतील महिला संघासाठी एक खास भेट देणार असल्याचे जाहीर केले आहे.

महिलांच्या टीम इंडियातील खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी तसेच या अविस्मरणीय विजयाचा जल्लोष करण्यासाठी टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सकडून (Tata Motors Passenger Vehicles) एक खास भेट दिली जाणार आहे. टाटा मोटर्सकडून टीम इंडियाचे प्रत्येक सदस्य आणि सपोर्ट स्टाफला बाजारात दाखल होणारी नवीन टाटा सिआरा (Tata Sierra) ही एसयूव्ही कारचे भेट म्हणून दिली जाणार आहे.

शैलेश चंद्र काय म्हणाले?

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडचे MD आणि CEO शैलेश चंद्र यांनी नुकतंच विश्वचषक विजेत्या महिला संघाचे अभिनंदन केले. “भारतीय महिला टीमने जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर देशाला गौरवास्पद क्षण दिला आहे. त्यांच्या या कर्तृत्वाचा सन्मान करताना आम्हाला आनंद होत आहे. टाटा सिएरा ही कार भारतीय ऑटोमोबाइल इतिहासातील एक लेगसी आयकॉन आहे, आणि या प्रतिष्ठित व्यक्तींना आम्ही एक प्रतिष्ठित गोष्ट भेट म्हणून देत आहोत. याचा आम्हाला आनंद आहे. या दोन्हीही गोष्टी प्रेरणेचे प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडचे MD आणि CEO शैलेश चंद्र यांनी दिली.

टाटा मोटर्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, विश्वचषक जिंकणाऱ्या टीमच्या प्रत्येक सदस्याला २५ नोव्हेंबर २०२५ रोजी लॉन्च होणाऱ्या Tata Sierra SUVच्या पहिल्या बॅचमधील टॉप-एंड मॉडेल भेट म्हणून दिली जाईल. ही कार ९० च्या दशकात ‘लाईफस्टाईल व्हेइकल’ म्हणून प्रसिद्ध होती. आता ती टाटा सिआरा या आधुनिक रूपात परत येत आहे.

नवीन सिएरा डिझाईनमध्ये जुन्या Sierra च्या ‘रॅप-अराऊंड ग्लास’ लूकची आधुनिक झलक दिसेल. त्यासोबतच कनेक्टेड LED लाईट बार हे खास आकर्षण असेल. यात टाटाची पहिली ट्रिपल-स्क्रीन डॅशबोर्ड (Three-Screen Setup), Level-2 ADAS आणि पॅनोरॅमिक सनरूफ यांसारखी आधुनिक वैशिष्ट्ये देखील असतील. तसेच इंजिन पर्यायांमध्ये यात १.५-लीटर टर्बो पेट्रोल आणि २.०-लीटर टर्बो डीझेल इंजिन दिले जाईल, तर इलेक्ट्रिक (EV) व्हेरिएंट नंतर लॉन्च होईल. या एसयूव्हीची किंमत अंदाजे १३.५० लाख ते २४ लाख (एक्स-शोरूम) दरम्यान असेल. ही कार Mahindra Thar Roxx आणि MG Hector सारख्या एसयूव्हीला टक्कर देईल.