
भारतीय महिला संघाने 2 नोव्हेंबर रोजी अखेर 52 वर्षांची प्रतिक्षा संपवली. भारताने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी मात करत तिसऱ्या प्रयत्नात पहिल्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी आपल्या नावावर केली. भारताने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये शफाली वर्मा हीच्या सर्वाधिक 87 धावांच्या मोबदल्यात 298 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला भारतीय गोलंदाजांनी 27 बॉलआधी ऑलआऊट केलं. भारताने दक्षिण आफ्रिकेला 45.3 ओव्हरमध्ये 246 रन्सवर ऑलआऊट केलं. भारतासाठी शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा या दोघींनी बॅटिंगसह बॉलिंगने अप्रतिम कामगिरी केली. दीप्तीने नाबाद 58 धावांच्या खेळीनंतर 5 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत पाठवला. तर शफालीने 2 विकेट्स मिळवल्या.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर भारताने नाव कोरलं आहे. भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण दक्षिण अफ्रिकेचा संघ 246 धावा करू शकला. यासह भारताने पहिल्यांदाच जेतेपद नावावर केलं आहे. भारताने वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलंं आहे. यापूर्वी 2005 आणि 2017 साली भारताने अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पण तिसऱ्यांदा भारताने वनडे वर्ल्डकप स्पर्धेवर नाव कोरलं. अंतिम फेरीत शफाली वर्माची खेळी महत्त्वाची ठरली. तिने फलंदाजी आणि गोलंदाजीत योगदान दिलं. भारताला विजय मिळवून देण्यात तिचा मोलाचा वाटा होता.
टीम इंडियाला डोकेदुखी ठरलेली नादीन डी क्लर्क अजूनही मैदानात आहे. शेवटच्या चेंडूवर धाव घेताना खाका धावचीत होत तंबूत परतली. अजूनही भारताला विजयासाठी एक विकेटची गरज आहे.
साखळी फेरीत सामना खेचून आणलेल्या नादीन डी क्लार्कचा सोपा झेल जेमिमान सोडला. दक्षिण अफ्रिकाला 36 चेंडूत 67 धावांची गरज आहे. तर भारताला दोन विकेट्सची गरज आहे.
दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी 7 षटकात 70 धावांची गरज आहे. तर भारताला विजयासाठी 2 विकेट्सची गरज आहे. कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दीप्ती शर्मा हीने एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला बॅकफुटवर ढकललं आहे. दीप्तीने कॅप्टन लॉरानंतर क्लो ट्रायन हीला आऊट केलं आहे.
टीम इंडियाला सातवी आणि सर्वात मोठी विकेट मिळाली आहे. दीप्ती शर्मा हीने दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन लॉरा वोल्वार्ड्ट हीला अमनजोतच्या हाती कॅच आऊट केलं आहे. लॉराने दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक 101 रन्स केल्या.
दीप्ती शर्मा हीने निर्णायक क्षणी एनेरी डर्कसन हीला क्लिन बोल्ड करत दक्षिण आफ्रिकेला सहावा झटका दिला आहे. मात्र त्यानंतरही टीम इंडियाला सामन्यात कमबॅक करण्यासाठी आणखी 1 विकेटची गरज आहे.
दक्षिण आफ्रिकेने 299 धावांचा पाठलाग करताना 200 धावा पूर्ण केल्या आहेत. लॉराने 38.5 ओव्हरमध्ये 200 धावांचा टप्पा पूर्ण केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या हातात 5 विकेट्स आहेत. त्यामुळे टीम इंडिया या महाअंतिम सामन्यात आता अडचणीत आली आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महाअंतिम सामना अखेरच्या टप्प्यात आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 299 धावांचं आव्हान दिलं आहे. दक्षिण आफ्रिकेने या धावांचा पाठलाग करताना 36 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 186 धावा केल्या आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 14 ओव्हरमध्ये (84 बॉल) 113 रन्सची गरज आहे. तर टीम इंडियाला 5 विकेट्सची गरज आहे.
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पाचवा झटका दिला आहे. दीप्ती शर्मा हीने सिनालो जाफ्ता हीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. जाफ्ताने 29 बॉलमध्ये 16 रन्स केल्या.
शफाली वर्मा हीने भारतासाठी बॅटिंगनंतर बॉलिंगने निर्णायक क्षणी कडक कामगिरी केली. शफालीने भारताला विकेटची गरज असताना 2 मोठे विकेट्स मिळवून दिल्या. शफालीने सुने लूस हीच्यानंतर मारिजान काप हीला आऊट केलं.
सुने लूस आणि कॅप्टन लॉरा वुल्फार्ट ही जोडी तिसऱ्या विकेटसाठी मोठी भागीदारी करुन टीम इंडियाची डोकेदुखी वाढवत होती. टीम इंडिया तिसऱ्या विकेटच्या प्रतिक्षेत होती. कॅप्टन हरमनप्रीत कौरने विकेटसाठी गोलंदाजीत बदल केला. हरमनप्रीतने शफाली वर्माला बॉलिंगची संधी दिली. शफालीने तिच्या पहिल्याच ओव्हरमध्ये ही सेट जोडी फोडली आणि भारताला तिसरी विकेट मिळवून दिली. शफालीने सुने लूसला आऊट केलं.
दक्षिण अफ्रिकेने 2 गडी गमवून 18 षटकात 100 धावांचा पल्ला गाठला आहे. लॉराने यात एकटीने 60 धावांचं योगदान दिलं आहे. तिची विकेट काढण्यासाठी भारतीय गोलंदाजांना कठीण जात आहे.
दक्षिण अफ्रिकेने 15 षटकात 2 गडी गमवून 75 धावा केल्या आहेत. लॉरा वॉल्वार्डस नाबाद 43 धावांवर खेळत आहे. तिची विकेट मिळणं खूपच गरजेच आहे. तरच दक्षिण अफ्रिकन संघावर दबाव वाढणार आहे.
दक्षिण अफ्रिकेला अँनेके बॉशच्या रुपाने दुसरा धक्का बसला आहे. श्री चरणीने तिला पायचीत करत तंबूचा रस्ता दाखवला. तिला खातंही खोलता आलं नाही.
दक्षिण अफ्रिकेला तनझिम ब्रिट्सच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे. अमनजोत कौरने अचूक नेम धरला आणि तिला तंबूचा रस्ता दाखवला. 23 धावा करून तंबूत परतली.
दक्षिण अफ्रिकेने 299 धावांचा पाठलाग करताना सावध सुरुवात केली आहे. लॉरा आणि ब्रिट्स जोडीने 7 षटकात 33 धावांची भागीदारी केली आहे. लॉरा वॉल्वार्ड 15, तर ब्रिट्स 14 धावांवर खेळत आहे.
रेणुका ठाकुरच्या गोलंदाजीवर तन्झमिन ब्रिट्सला पायचीतसाठी जोरदार अपील करण्यात आली. पण पंचांनी नकार दिला. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने रिव्ह्यू घेतला आणि तो वाया गेला. कारण चेंडू आउटसाईड पिच झाला होता.
भारताने विजयासाठी दिलेल्या 299 धावांचा पाठलाग करण्यासाठी दक्षिण अफ्रिकेकडून लॉरा वॉल्वार्ड आणि तन्झमिन ब्रिट्स ही जोडी मैदानात उतरली आहे. भारताला झटपट विकेट घेण्याचं मोठं आव्हान असणार आहे. तर आणि तरच दक्षिण अफ्रिकेवर दबाव वाढू शकतो.
भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 299 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 50 षटकात 7 गडी गमवून 298 धावा केल्या आणि विजयासाठी 299 धावांचं लक्ष्य दिलं आहे. शेवटच्या चेंडूवर राधा यादव स्ट्राईकला होती. तिने फटका मारला आणि धावत सुटली. पण दोन धावा घेताना दीप्ती शर्मा 58 धावा करून रनआऊट झाली. आता भारतीय गोलंदाजांपुढे दक्षिण अफ्रिकेला रोखण्याचं आव्हान असणार आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या नव्या विजेत्याचा निकाल 50 षटकांच्या उर्वरित सामन्यात लागणार आहे.
ऋचा घोषच्या रुपाने टीम इंडियाला सहावा धक्का बसला आहे. ऋचा घोषने 24 चेंडूत 34 धावा केल्या आहे. भारताने 49 षटकात 292 धावा केल्यात. 300 धावांची खेळी अपेक्षित आहे.
दीप्ती शर्माने 53 चेंडूत नाबाद 50 धावांची खेळी केली. भारताने 48 षटकात 5 गडी गमवून 286 धावा केल्या आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
भारताने 45 षटकात 5 गडी गमवून 259 धावा केल्या आहेत. अजूनही 30 चेंडूचा खेळ शिल्लक असून 300 पार धावा करण्याची अपेक्षा आहे. दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष मैदानात आहेत.
अमनजोत कौर फक्त 12 धावा करून तंबूत परतली आहे. नादीन डी क्लर्कने तिचा स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत बाद केला. भारताच्या 5 गडी बाद 245 धावा झाल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेची फिरकीपटू मलाबा हीने भारताला मोठा झटका दिला आहे. मलाबाने टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हीला क्लिन बोल्ड केलंय. हरमनप्रीतने 29 बॉलमध्ये 20 रन्स केल्या आहेत. त्यामुळे भारताचा स्कोअर आता 39 ओव्हरनंतर 4 आऊट 223 असा झाला आहे.
भारताने खणखणीत सुरुवातीनंतर ठराविक अंतराने 3 झटके गमावले. दक्षिण आफ्रिकेने भारताच्या स्मृती मंधाना, शफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्स या तिघींना आऊट केलं. त्यानंतर आता कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा ही जोडी खेळत आहे. या जोडीवर मोठी भागीदारी करण्याची जबाबदारी आहे.
दक्षिण आफ्रिकेने भारताला तिसरा झटका देत जोरदार कमबॅक केलं आहे. दक्षिण आफ्रिकेने स्मृती मंधाना, शफाली वर्मा हीच्यानंतर जेमीमा रॉड्रिग्स हीला आऊट केलं आहे. जेमीने 37 बॉलमध्ये 24 रन्स केल्या.
दक्षिण आफ्रिकेने भारताला दुसरा आणि मोठा झटका दिला आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताची सेट ओपनर शफाली वर्मा हीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. शफालीने 78 बॉलमध्ये 87 रन्स केल्या.
भारताने स्मृती मंधानाच्या रुपात पहिली विकेट गमावल्यानंतर आता शफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज ही जोडी जमली आहे. भारताने 26 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 158 रन्स केल्या आहेत. शफाली 83 तर जेमिमा 19 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे.
स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या जोडीने शतकी भागीदारी करुन भारताला अप्रतिम सुरुवात करुन दिली. मात्र दक्षिण आफ्रिकेने भारताला 104 धावांवर पहिला झटका दिला. स्मृती मंधाना 58 बॉलमध्ये 45 रन्स करुन कॅच आऊट झाली.
स्मृती मंधान आणि शफाली वर्मा या सलामी जोडीने महाअंतिम सामन्यात चाबूक सुरुवात करुन दिली आहे. या जोडीने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे.
स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या सलामी जोडीने भारताला अपेक्षित अशी सुरुवात करुन दिली आहे. भारताच्या या जोडीने बिनबाद 14 ओव्हरमध्ये 80 रन्स केल्या आहेत. स्मृती 33 आणि शफाली 38 रन्सवर नॉट आऊट आहेत.
टीम इंडियाने या स्पर्धेतील महाअंतिम सामन्यात पावरप्लेमधील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. भारताने पावरप्लेमध्ये बिनबाद 64 धावा केल्या आहेत. स्मृती मंधाना 27 आणि शफाली वर्मा 29 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे.
शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीने भारताला अप्रतिम सुुरुवात करुन दिली आहे. या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. आहे. भारताने 6.3 ओव्हरमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे. शफाली आणि स्मृती दोघींनीही 20 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीने भारताला आश्वासक सुरुवात मिळवून दिली आहे. भारताने 5 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 31 धावा केल्या आहेत. स्मृती मंधाना हीने 15 बॉलमध्ये 7 रन्स केल्या आहेत. तर शफालीने 15 चेंडूत 21 धावा जोडल्या आहेत.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 फायनलला सुरुवात झाली आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने आहेत. दक्षिण आफ्रिकेने भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाकडून शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना ही सलामी जोडी मैदानात बॅटिंगसाठी आली आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिलं षटक हे निर्धाव टाकलं.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर.
दक्षिण आफ्रिका महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, ॲनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), ॲनेरी डेर्कसेन, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा.
हरमनप्रीत कौर म्हणाली की, ओव्हरहेड कंडिशन पाहता आम्ही गोलंदाजी करण्याचा विचार करत होतो. आम्ही चांगली फलंदाजी करण्याचा आणि चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू. पाच सहा षटकांनंतर खेळपट्टीवर फार काही असेल असे मला वाटत नाही. आम्ही त्याच संघासह जात आहोत. सेमीफायनलनंतर आमच्याकडे सावरण्यासाठी दोन दिवस होते आणि सर्वजण या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
लॉरा वोल्वार्ड म्हणाली की, आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. थोडासा पाऊस पडेल आणि नंतर दव पडेल. पावसामुळे सुरुवातीला थोडीशी घसरगुंडी होण्याची आशा आहे. उपांत्य फेरीतील आमच्यात कोणताही बदल झालेला नाही. आमच्यासाठी हा सामना खूप मोठा आहे आणि येथे येऊन मोठ्या प्रेक्षकांसमोर खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्ही खरोखर उत्साहित आहोत. आम्हाला खूप आत्मविश्वास आहे.
अंतिम फेरीच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला. कर्णधार लॉरा वॉल्वार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. भारताने या स्पर्धेत फक्त एकदाच टॉस जिंकला आहे.
भारत दक्षिण अफ्रिका यांच्यातील नाणेफेकीचा कौल हा 4.32 वाजता होणार आहे. तसेच सामन्याला 5 वाजता सुरु होणार आहे. 50 षटकांचा सामना होणार आहे.
अंतिम फेरीसाठी 2 तासांचा वाढीव वेळेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच रात्री 9 वाजून 8 मिनिटांपर्यंत खेळ सुरु झाल्यास 20 ओव्हरची मॅच खेळवण्यात येईल. तसेच त्यानंतर पुन्हा पावसाने खोडा घातला तर राखीव दिवसाचा (3 नोव्हेंबर) विचार केला जाईल. मात्र आजच रविवारी सामन्याचा निकाल लावण्याचा प्रयत्न केला जाईल.
लेडी सेहवाग म्हणून ओळखली जाणारी टीम इंडियाची शफाली वर्मा हीला प्रतिका रावलच्या जागी संधी देण्यात आली. प्रतिकाला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. शफालीने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध आक्रमक सुरुवात केली. मात्र शफाली 10 धावांवर बाद झाली. आता अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान आहे. त्यामुळे शफालीकडून फायनलमध्ये मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. शफाली महाअंतिम सामन्यात कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पाऊस पूर्णपणे थांबला नाही तरी थोडा कमी झाला आहे असे दिसते. अजूनही पंच मैदानाच्या कव्हरजवळ बसून ग्राउंड स्टाफशी गप्पा मारत आहेत. परंतु मैदानावर काही खड्डे पडले आहेत. त्यामुळे पाऊस थांबला तरी ग्राउंड स्टाफला ते साफ करण्यासाठी बराच वेळ लागेल.
पावसाने उसंत घेतल्यानंतर दुपारी 3 वाजता नाणेफेकीचा कौल होणार असं सांगितलं जात होतं. पण पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने आता नाणेफेकीचा कौल लांबणार आहे. सामना 5 वाजण्याच्या आत सुरु झाला तर एकही षटक कमी होणार नाही. त्यानंतर षटकं कमी करण्यास सुरुवात होईल.
नाणेफेकीचा कौल दुपारी 3 वाजता होणार आहे. तर सामन्याला सुरुवात 3.30 वाजता होईल. म्हणजेच सामना ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने होणार आहे.
गेल्या काही तासांपासून सुरु असलेल्या पावसाने उसंत घेतली आहे.आकाश निळं दिसत असून मैदानातील कव्हर काढले जात आहेत. पंच ग्राउंड स्टाफशी चर्चा करत आहे. नियोजित नाणेफेकीचा कौल उशिराने होण्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दोन्ही संघ एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात एकूण 34 वेळा भिडले आहेत. भारताने या 34 पैकी 20 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने 13 वेळा मैदान मारलं आहे. तर उभयसंघातील 1 सामना निकाली निघाला नाही.
भारत-दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ साखळी फेरीत भिडले होते. दक्षिण आफ्रिकेने भारतावर 9 ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात 3 विकेट्सने विजय मिळवला होता. आता भारताकडे या पराभवाचा हिशोब करण्याची संधी आहे.
दक्षिण आफ्रिकेची साखळी फेरीतील सुरुवात आणि शेवट पराभवाने झाला. तसेच दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत सलग आणि एकूण 5 सामने जिंकले. तर दक्षिण आफ्रिकेला 2 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
या स्पर्धेत प्रत्येक संघाला साखळी फेरीत 7 सामने खेळण्याची संधी मिळाली. भारताने साखळी फेरीतील 7 पैकी 3 सामने जिंकले. तर तितक्यात सामन्यात पराभूत व्हावं लागलं. तर भारताचा साखळी फेरीतील बांगलादेश विरुद्धचा शेवटचा सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला.टीम इंडिया साखळी फेरीत चौथ्या स्थानी राहिली.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत वूमन्स वर्ल्ड कप फायनल मॅचला दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
शफाली वर्मा, स्मृती मंधाना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंह ठाकूर, स्नेह राणा, हरलीन देओल, अरुंधती रेड्डी आणि उमा छेत्री.
लॉरा वोल्वार्ड (कॅप्टन), तझमिन ब्रिट्स, ॲनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), ॲनेरी डेर्कसेन, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको मलाबा, मसाबता क्लास, तुमी सेखुखुने, नोंदुमिसो शांगासे आणि कराबो मेसो.
वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या दोघांपैकी कोणता संघ अंतिम फेरीत मैदान मारणार? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. हा सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.