AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND VS SL | श्रीलंकेविरुद्ध कहर, कुलदीप यादवसोबत मॅचच्या 2 मिनिट आधी काय झालेलं? कोण त्याच्यासोबत बोललेलं?

IND VS SL | समाविक्रमाचा विकेट घेतल्यानंतर केएल राहुलकडे का इशारा करत होता?असा प्रश्न सूर्यकुमार यादवने कुलदीपला विचारला. त्यावर कुलदीपने उत्तर दिलं.

IND VS SL | श्रीलंकेविरुद्ध कहर, कुलदीप यादवसोबत मॅचच्या 2 मिनिट आधी काय झालेलं? कोण त्याच्यासोबत बोललेलं?
दरम्यान, आशिया कपच्या फायनलमध्ये कुलदीप यादवकडून अशाच सर्वोत्तम प्रदर्शनाची अपेक्षा असणार आहे. कुलदीपचा वर्ल्ड कप संघातही समावेश असल्याने त्याची रंगीत तालीमही एका अर्थाने चांगली सुरू आहे, असं म्हणता येईल. Image Credit source: PTI
| Updated on: Sep 13, 2023 | 3:27 PM
Share

कोलंबो : श्रीलंकेविरुद्ध दमदार विजय मिळवून टीम इंडिया आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. चायनामन गोलंदाज कुलदीप यादव टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. श्रीलंकेविरुद्ध त्याने 43 धावात 4 विकेट घेतले. कुलदीप यादवने सलग दुसऱ्या सामन्यात टीमला विजय मिळवून दिला. पाकिस्तान विरुद्ध कुलदीपने पाच विकेट काढले होते. आशिया कपच्या दोन सामन्यात कुलदीप यादवने 9 विकेट घेतल्या आहेत. कुलदीप यादवने श्रीलंकेविरुद्ध उत्तम गोलंदाजीच श्रेय सूर्यकुमार यादवला दिलं. मॅचनंतर सूर्यकुमार यादवने कुलदीप यादव बरोबर चर्चा केली. कुलदीप यादवला चांगल्या प्रदर्शनाबद्दल विचारलं. आपल्या चांगल्या परफॉर्मन्समागे सूर्यकुमार यादवचा रोल असल्याच कुलदीपने सांगितलं.

सूर्यकुमार मॅचच्या दोन मिनिट आधी आपल्याशी बोलला होता, असं कुलदीप म्हणाला. पाकिस्तान सारखीच गोलंदाजी श्रीलंकेविरुद्ध करायची आहे, असं सूर्यकुमार कुलदीपला म्हणाला होता. पाच विकेट घेतल्यानंतर तुम्ही पुढच्या मॅचमध्ये थोडे रिलॅक्स होता. पण सूर्यकुमारने कुलदीपला आणखी चांगला खेळ दाखवायला सांगितलं. कुलदीप यादवने सूर्यकुमारला आपल्या यशाच श्रेय दिलं. त्यावेळी तो थोडा भावुक झाला होता. सलग दोन सामने खेळण्यासाठी शरीराची कशी तयारी केली? त्या बद्दलही कुलदीपने सांगितलं.

श्रीलंकेविरुद्ध सामन्याच्या दिवशी कुलदीपने काय केलं?

“पाकिस्तान विरुद्ध सामन्यानंतर रिकव्हरीसाठी कुलदीप स्विमिंग पूलमध्ये गेला. त्यानंतर चांगला डिनर केला. श्रीलंकेविरुद्ध सामना होता. त्या दिवशी तो सकाळी 10 वाजल्यानंतर उठला. चांगला नाश्ता केला. देशासाठी कुठलाही सामना खेळताना चांगलं प्रदर्शन करण्याची जिद्द मनामध्ये असते” असं कुलदीपने सांगितलं.

केएल राहुलकडे का इशारा केला?

समाविक्रमाचा विकेट घेतल्यानंतर केएल राहुलकडे का इशारा करत होता?असा प्रश्न सूर्यकुमार यादवने कुलदीपला विचारला. त्यावर कुलदीपने सांगितंल की, “चेंडू खूप वळतोय असं केएल राहुलने सांगितलं होतं. त्याने पाचव्या स्टम्पवर गोलंदाजीचा सल्ला दिला होता. जेणेकरुन फलंदाजाला खेळताना अडचण येईल. तो सल्ला कामी आला व समाविक्रमाच्या विकेटच श्रेय केएल राहुलला दिलं”

Follow Us
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात