IND vs ZIM :जगातील श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयकडून मोठी चूक, वर्ल्ड कप जिंकूनही… काय झालं नेमकं?

ZIM vs IND: टीम इंडिया आणि झिम्बाब्वेमधील पहिला टी-२० सामना सुरू आहे. या सामन्यात एक मोठी चूक समोर आलीये. बीसीीसीआयच्या पण लक्षात आली नाही का असा सवाल क्रीडा वर्गातून केला जात आहे.

IND vs ZIM :जगातील श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयकडून मोठी चूक, वर्ल्ड कप जिंकूनही... काय झालं नेमकं?
| Updated on: Jul 06, 2024 | 6:17 PM

टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकला असून आता नवीन दमाचे खेळाडू मैदानात उतरलेत. टीम इंडिया आणि झिम्बाब्वेमधील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरूवात झाली आहे. या मालिकेमध्ये टीम इंडियाचे युवा खेळाडू पहिल्यांदाच दिग्गजांच्या निवृत्तीनंतर मैदानात उतरत आहेत. शुबमन गिलकडे नेतृत्त्वाची धुरा सोपवण्यात आलीये. टीम इंडिया 8 वर्षांनंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर गेली असून यंगिस्तान टीम कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. यादरम्यान बीसीसीआयने एक मोठी चूक केल्याची चर्चा होताना दिसत आहे.

टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध मैदानात उतरल्यावर जर्सीवरील एक चूक झाली आहे. खेळाडूंने परिधान केलेल्या खेळाडूंचे फोटो आणि व्हिडीओ समोर आलेत. खेळाडूंच्या या जर्सीवर एकच स्टार आहे जे दोन असायाला हवे होते. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या नावावर आता दोन टी-20 वर्ल्ड कप झाले आहेत. 2007 आणि 2024 असे दोन वर्ल्ड भारताच्या नावावर आहेत. मात्र जर्सीवर एकच स्टार आहे. आता मॅचम्ध्ये टीम इंडिया कोणती जर्सी घालून उतरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

 

भारताचा संघ-: शुबमन गिल (कर्णधार), रुतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा, हर्षित राणा.