‘रोहित-विराटने धावा केल्या नाहीत तर…’, पाकिस्तानच्या खेळाडूने उधळली मुक्ताफळ

'रोहित-विराटने धावा केल्या नाहीत तर...', पाकिस्तानच्या खेळाडूने उधळली मुक्ताफळ
Rohit Sharma Virat Kohli

पाकिस्तान विरुद्धच्या मोठ्या सामन्यामध्ये या दोघांनी धावा बनवल्या नाहीत, तर अन्य भारतीय खेळाडूंना त्या दबावाचा सामना करणं, सोपं नसेल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 22, 2022 | 6:29 PM

लाहोर: पाकिस्तान विरुद्धच्या टी 20 वर्ल्डकपच्या सामन्यात (Ind vs Pak World cup Match) कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीने (Virat kohli) धावा केल्या नाहीत, तर भारतीय संघासाठी दबावाचा सामना करणं सोप नसेल, असं मत पाकिस्तानचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद हाफीझने व्यक्त केलय. “भारतीय संघ सध्या या दोघांवर अवलंबून आहे. अन्य स्थानांसाठी त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत. पाकिस्तान सारख्या संघाविरुद्ध खेळताना, जो दबाव असतो, त्याचा सामना रोहित आणि कोहलीचं उत्तम प्रकारे करु शकतात” असं मोहम्मद हाफीझचं म्हणणं आहे.

दबावाचा सामना करणं, सोपं नसेल

“पाकिस्तानचा संघ विकसित होतोय, भारताविषयी बोलायचं झाल्यास, विराट आणि रोहित त्यांचे महत्त्वाचे खेळाडू आहेत. पाकिस्तान विरुद्धच्या मोठ्या सामन्यामध्ये या दोघांनी धावा बनवल्या नाहीत, तर अन्य भारतीय खेळाडूंना त्या दबावाचा सामना करणं, सोपं नसेल” असं हाफिझला वाटतं. स्पोटर्स तकशी बोलताना त्याने ही मत व्यक्त केली. हाफीझने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

निवृत्तीच्या आधी हे साध्य झालं त्याचा आनंद

मागच्यावर्षी झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये तो पाकिस्तानी संघाचा भाग होता. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारतावर विजय मिळवावा, अशी नेहमीच इच्छा होती. निवृत्तीच्या आधी हे साध्य झालं, त्याचा आनंद आहे असे 41 वर्षीय हाफीझ म्हणाला. पाकिस्तानने या सामन्यात प्रथमच भारताचा दहा विकेटने पराभव केला होता. “वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारतावर विजय मिळवला, तर त्या संघाचा आपण भाग असावे, अशी माझी नेहमीच इच्छा होती. हे असं घडलं आणि मी त्या संघाचा भाग होतो, याचा मला अभिमान आहे” असे हाफिझ म्हणाला.

India will struggle against Pakistan if Virat Kohli Rohit Sharma don’t score Mohammad Hafeez

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें