IPL 2022: IPL च्या आयोजनासाठी मुंबई-पुणे आघाडीवर, समजून घ्या BCCI चा प्लान

IPL 2022: IPL च्या आयोजनासाठी मुंबई-पुणे आघाडीवर, समजून घ्या BCCI चा प्लान
(Source - Twitter)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय, (BCCI) इंडियन प्रिमियर लीग गव्हर्निंग काऊन्सिल आणि आयपीएल फ्रेंचायजींमध्ये (IPL) आज शनिवारी महत्त्वाची बैठक पार पडली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 22, 2022 | 5:28 PM

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय, (BCCI) इंडियन प्रिमियर लीग गव्हर्निंग काऊन्सिल आणि आयपीएल फ्रेंचायजींमध्ये (IPL) आज शनिवारी महत्त्वाची बैठक पार पडली. आयपीएलचा आगामी मोसम आणि स्थळाबद्दल या बैठकीत चर्चा झाली. आयपीएल 2022 चा मोसम भारतातच आयोजित करण्याबद्दल बीसीसीआयला विश्वास आहे. पण आयपीएल स्पर्धेपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली नाही, तर त्यासाठी बॅकअप प्लानही सज्ज ठेवण्यात येणार आहे.

मुंबई-पुण्यात IPL?

आयपीएल 2022 स्पर्धा भारतातच आयोजित करता येईल, अशी बोर्डाला अपेक्षा असल्याचे सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितलं. मुंबई, पुण्यामध्ये वेगवेगळी मैदानं उपलब्ध असल्यामुळे स्पर्धा आयोजित करणं सोप होईल, असं बीसीसीआयचं मत आहे. आयपीएलमध्ये एकूण 10 टीम्स यंदा खेळणार आहे. लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवे संघ आहेत.

सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबाद संघ विकत घेतला आहे. त्यासाठी 5625 कोटी रुपये मोजलेत. RPSG समूहाने लखनऊचे हक्क विकत घेतलेत, त्यासाठी 7090 कोटी रुपये मोजलेत.

मुंबई-पुण्याचा पर्याय व्यवहार्य का?
आयपीएल 2022 च्या आयोजनासाठी मुंबई आणि पुणे या दोन शहरांना बीसीसीआयने प्राधान्य दिलं आहे. या दोन शहरात सामने भरवण्याचा पर्याय व्यवहार्य आहे. फक्त रस्ते मार्गाने प्रवास होईल व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हवाई प्रवासातील धोके टाळता येतील. कोरोनामुळे देशातील आयपीएल स्पर्धा गुंडाळावी लागली, तर फ्रेंचायजींच प्राधान्य दक्षिण आफ्रिका आणि यूएई या दोन देशांना आहे. बीसीसीआय श्रीलंकेचा सुद्धा विचार करतेय.

मुंबईचं वानखेडे स्टेडियम, त्याच्या जवळच असलेलं ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डी.वाय.पाटील आणि पुणे गहुजे येथे असलेलं महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचं स्टेडियम या चार मैदानांवर संपूर्ण IPL चा सीजन खेळवण्याचा BCCI चा विचार आहे.

शरद पवारांची घेतली भेट
या संदर्भात पाच जानेवारीला बीसीसीआयचे अंतरीम CEO व आयपीएलचे चीफ ऑपरेटींग ऑफिसर हेमांग अमीन यांनी मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांची भेट घेतली. काही दिवसांनी अमीन आणि पाटील यांनी राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बीसीसीआयच्या प्रस्तावाला शरद पवारांनी हिरवा कंदिल दाखवल्याची माहिती आहे. या आठवड्यात किंवा पुढच्या दहा दिवसात बीसीसीआय आणि एमसीएचे अधिकारी या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्स सचिव सीताराम कुंटे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. आवश्यक परवानग्या मिळवण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होईल. विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं होतं.

IPL 2022 BCCI confident of hosting tournament in India Mumbai pune possible venues

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें