AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shardul Thakur: ‘वजन कमी कर’, झहीर खानने शार्दुल ठाकूरला दिला होता सल्ला

मुंबई: शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) उत्तम ऑलराऊंडर म्हणून लवकरच संघात आपलं स्थान भक्कम करु शकतो. पालघरच्या या 30 वर्षीय खेळाडूने शुक्रवारी पुन्हा एकदा आपल्या बॅटचा तडाखा दाखवला. पार्लच्या दुसऱ्यावनडेत (Paarl second oneday) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (INDvsSA) त्याने 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पहिल्या वनडेत त्याने अर्धशतक झळकावलं होतं. शार्दुलने 38 चेंडूत 40 आणि रविचंद्रन अश्विनने 24 […]

Shardul Thakur: 'वजन कमी कर', झहीर खानने शार्दुल ठाकूरला दिला होता सल्ला
| Edited By: | Updated on: Jan 22, 2022 | 3:59 PM
Share

मुंबई: शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) उत्तम ऑलराऊंडर म्हणून लवकरच संघात आपलं स्थान भक्कम करु शकतो. पालघरच्या या 30 वर्षीय खेळाडूने शुक्रवारी पुन्हा एकदा आपल्या बॅटचा तडाखा दाखवला. पार्लच्या दुसऱ्यावनडेत (Paarl second oneday) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (INDvsSA) त्याने 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पहिल्या वनडेत त्याने अर्धशतक झळकावलं होतं. शार्दुलने 38 चेंडूत 40 आणि रविचंद्रन अश्विनने 24 चेंडूत 25 धावा केल्या. शेवटच्या सहा षटकात दोघांनी सातव्या विकेटसाठी नाबाद 48 धावांची भागीदारी केली.

शार्दुलवर अवलंबून राहता येईल त्यामुळे भारताला सहा बाद 287 धावांचा पल्ला गाठता आला. पहिल्या वनडेत शार्दुलने 43 चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती. यात पाच चौकार आणि एक षटकार होता. फलंदाजीमध्ये शार्दुलवर अवलंबून राहता येईल, तो एक चांगला पर्याय ठरु शकतो असं दिसतय. भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने सुद्धा ‘पालघर एक्स्प्रेस’चं कौतुक केलं. झहीरने भारतासाठी कसोटी, वनडे आणि टी-20 मध्ये एकूण 597 विकेट घेतल्या आहेत. सुरुवातीला झहीरने सुद्धा शार्दुलला मार्गदर्शन केलं होतं. मुंबई रणजी संघातून एकत्र खेळताना झहीरने शार्दुलला वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता.

तो आपल्या प्रतिभेला न्याय देतोय “शार्दुल बॅट आणि बॉल दोघाने योगदान देतोय. सुरुवातीच्या वर्षात मुंबईकडून रणजी खेळताना त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने स्वत:चा ठसा उमटवला होता. तेव्हाही तो फलंदाजी करायचा. शार्दुल त्याच्या क्षमतेनुसार खेळतोय, हे पाहून मला आनंद होतोय. त्याच्याकडून अपेक्षा ठेवल्या जाऊ शकतात. तो आपल्या प्रतिभेला न्याय देतोय, हे पाहून समाधान वाटतं” असं झहीर खान क्रिकबझशी बोलताना म्हणाले.

दुसऱ्या वनडेत बॅटने दमदार कामगिरी केल्यानंतर शार्दुलने क्विंटन डि कॉकची विकेट मिळवून एक महत्त्वाची भागीदारी तोडली. पाच षटकात त्याने एक विकेटच्या मोबदल्यात 35 धावा दिल्या. फलंदाजी इतकी गोलंदाजीत तो दोन्ही वनडेत चमक दाखवू शकला नाही.

Zaheer Khan recalls telling a young Shardul Thakur to lose weight

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.