Rajeshwari gayakwad: भारतीय महिला क्रिकेटरचा दुकानदाराबरोबर ‘राडा’, मित्रांची दुकानात घुसून मारहाण

Rajeshwari gayakwad: सुपरमार्केटमधील घटना, नेमकं तिथे काय घडलं?

Rajeshwari gayakwad: भारतीय महिला क्रिकेटरचा दुकानदाराबरोबर 'राडा', मित्रांची दुकानात घुसून मारहाण
indian womens team
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 6:33 PM

विजयपुरा: टीम इंडियाची फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाड आपल्या खेळामुळे चर्चेत असते. पण गुरुवारी ती एका मोठ्या वादात अडकली. राजेश्वरी मूळची कर्नाटक विजयपुराची रहिवाशी आहे. ती विजयपुरा सुपरमार्केटमधल्या एका दुकानदाराला भिडली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. स्टार गोलंदाज राजेश्वरी गायकवाडच्या अडचणी वाढत चालल्या आहेत.

या वादाच पर्यावसन मोठ्या भांडणात झालं

31 वर्षाच्या राजेश्वरी गायकवाडने सध्या क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे ती घरीच आहे. गुरुवारी ती आपल्या काही मित्रांसह सामना आणण्यासाठी सुपरमार्केटमध्ये गेली होती. तिथे तिचा वाद झाला. या वादाच पर्यावसन मोठ्या भांडणात झालं. व्हायरल व्हिडिओत दोन्ही बाजू रागामध्ये दिसतायत.

दुकानदाराला भिडली गायकवाड

राजेश्वरी या दुकानात सामना विकत घेत होती. त्यावेळी काही कारणावरुन तिचा दुकानदाराबरोबर वाद झाला. तिच्यासोबत एक महिला होती. दुकानदार आणि राजेश्वरी दोघे रागात होते. काही वेळाने गायकवाडला ओळखणारे दुकानात घुसले व त्यांनी मारहाण सुरु केली. दोन्ही बाजूंना पोलिसात तक्रार नोंदवायची होती. नंतर परस्पर सहमतीने त्यांनी तक्रार नोंदवायची नाही, असा निर्णय घेतला. हे संपूर्ण प्रकरण दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालय.

राजेश्वरी भारतीय टीमचा महत्त्वाचा भाग

राजेश्वरी गायकवाड टीम इंडियातील एक मोठं नाव आहे. मागच्या 8 वर्षांपासून ती भारतासाठी क्रिकेट खेळतेय. तिने भारतासाठी दोन टेस्ट, 64 वनडे आणि 44 टी-20 सामने खेळलेत. राजेश्वरी गायकवाडने न्यूझीलंड विरुद्ध 2017 वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं होतं. तिने त्या सामन्यात 15 धावा देऊन 5 विकेट काढल्या होत्या. वनडे इंटरनॅशनलमध्ये तिने 20.79 च्या सरासरीने 99 विकेट घेतल्या आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये 17.40 च्या सरासरीने 54 विकेट काढल्यात.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.