AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सायना नेहवाल हिचे यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याला ओपन चॅलेंज, ‘माझा त्याला…’

Saina Nehval challenge to jasprit bumrah : जगात नंबर वनचा बॉलर असलेल्या जसप्रीत बुमराहला भारताची स्टार टेनिसपटून सायना नेहवाल हिने चॅलेंज दिलं आहे. एका पॉडकास्टामध्ये सायना बोलत होती. पण तिने त्याचं नाव का घेतलं जाणून घ्या.

सायना नेहवाल हिचे यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याला ओपन चॅलेंज, 'माझा त्याला...'
| Updated on: Aug 10, 2024 | 6:37 PM
Share

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल परत एकदा चर्चेत आली आहे. भारतामध्ये क्रिकेट खेळाचे वर्चस्व जास्त असल्याचा दावा सायनाने मागे केला होता. क्रिकेटपेक्षा जास्त शारिरीक ताकद इतर खेळांना लागत असल्याचं म्हणाली होती. त्यानंतर सोशल मीडियावर हा वाद चांगलाच पेटलेला दिसला होता. केकेआरच्या खेळाडूने या वादामध्ये उडी घेत बुमराहच्या 150 किमी प्रतितास वेगाने येणाऱ्या चेंडूचा सामना करण्याचं आव्हान सायनाला दिलं होतं. त्यानंतर त्या खेळाडूने माफीसुद्धा माफी मागितली होती. आता शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टवर पॉडकास्टमध्ये बोलताना बुमराहलाच सायना नेहवालने आव्हान दिलं आहे.  त्यासोबतच सर्व देशवासियांना एक सवाल केला आहे.

तुम्ही विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासारखे खेळाडू बनू शकणार नाहीत. क्वचितच काही खेळाडू त्यांच्यासारखे बनू शकतात. क्रिकेट हा जास्त टेक्निकचा खेळ आहे, जर राहिला बुमराहचा प्रश्न तर मला त्याच्यासोबत का खेळायचं आहे. जर बुमराह माझ्यासोबत बॅडमिंटन खेळला तर त्याला माझा स्मॅश झेपणार नसल्याचं सायना नेहवाल म्हणाली.

आपल्याच देशात आपण असं भांडत बसायला नाही पाहिजे. प्रत्येक खेळ हा मोठा आहे पण क्रिकेटप्रमाणेच इतर खेळांनाही महत्त्व द्यायला हवं. नाहीतर खेळ संस्कृती कशी राहणार? आपलं सर्वांचं लक्ष हे कायम क्रिकेट आणि बॉलिवुड राहतं. जर कोणी पदक जिंकलं तर फक्त कौतुक करतात पण त्यानंतर काय? आपण चार ते पाच पदकांवरच समाधानी राहायचं आहे का? असा प्रश्न सायना नेहवालने देशवासियांना केला आहे.

भारतामध्ये खेळाची संस्कृती वेगळी आहे. क्रिकेटकडे खूप जास्त महत्त्वा दिलं जातं याचं वाईट वाटतं. पण तसं पाहायला गेलं तर बॅडमिंटन, बास्केटबॉल, टेनिस हे खेळ शारीरिकदृष्ट्या अवघड असून त्यासाठी तुमच्याकडे स्किल असणं गरजेचं असावे लागतात. नीरज चोप्रा, मीराबाई चानू आणि विनेश फोगाट यांना लोकं ओळखतात याचं कारण म्हणजे आम्ही सातत्याने चांगली कामगिरी करत वर्तमानपत्रामध्ये झळकल्याचं सायना मागील निखिल विजयेंद्रच्या पॉडकास्टमध्ये म्हणाली होती.

दरम्यान, सायनाने 2012 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य, 2015 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य आणि 2017 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते. तर 2010 आणि 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.