IND vs SL : टीम इंडिया DRS घेताना कशी ठरते सक्सेसफुल, या दोन खेळाडूंवर हिटमॅन ठेवतो विश्वास, रोहितकडून मोठा खुलासा!

IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यानंतर रोहितने डीआरएस घेताना काय करतो याबाबत खुलासा केला आहे. रोहितने संघातील दोन खेळाडूंचा सल्ला घेत असल्याचा खुलासा केला आहे.

IND vs SL : टीम इंडिया DRS घेताना कशी ठरते सक्सेसफुल, या दोन खेळाडूंवर हिटमॅन ठेवतो विश्वास, रोहितकडून मोठा खुलासा!
| Updated on: Nov 04, 2023 | 2:22 PM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये भारताने 302 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. या सामन्यानंतर भारत सेमी फायनलमध्ये जाणारा पहिला संघ ठरला आहे. या सामन्यामध्ये भारतीय वेगवान गोलंदाजांनी श्रीलंकेच्या खेळाडूंना अक्षरक्ष: नाचवलं. भारताच्या 358 धावांचा पाठलाग करताना श्रालंकेचा संघ अवघ्या 55 धावांवर गारद झाला. सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा याने डीआरस घेताना तो काय विचार करतो याबाबत त्याने खुलासा केलाय.

डीआरएस घेताना मी तो निर्णय गोलंदाज आणि कीपर यांच्यावर सोपवतो त्यासोबतच मला ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांचा त्यावेळी सल्ला घेतो. ते खेळाडू मी ठरवून ठेवले आहेत कारण माझा त्यांच्यावर विश्वास असल्याचं रोहित शर्माने म्हटलं आहे. रोहितने सांगितल्यानुसार तो जो गोलंदाजी करत असेल त्याच्यावर आणि दुसरा म्हणजे के.एल. राहुल आहे.

रोहितच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया दमदार कामगिरी करत असून सलग सातवा विजय मिळवला आहे. संघातील प्रत्येक खेळाडू सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. सांघिक कामगिरीमुळे टीम इंडिया आतापर्यंत यशस्वी ठरली आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यांंमध्येही अशीच कामगिरी करण्यासाठी रोहितचे शिलेदार सज्ज  आहेत.

भारतीय संघ (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

श्रीलंका संघ (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (W/C), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका