AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रोलर्सना कसं देतोस उत्तर?, चाहत्याच्या प्रश्नावर कोहलीचा हटके जवाब, फोटो शेअर करत दिलं उत्तर

विराट कोहली सध्या जगातील अव्वल क्रमाकांचा फलंदाज आहे. असे असतानाही त्याला सोशल मीडियवर ट्रोलर्स आणि मीम्सचा सामना करावा लागतो.

ट्रोलर्सना कसं देतोस उत्तर?, चाहत्याच्या प्रश्नावर कोहलीचा हटके जवाब, फोटो शेअर करत दिलं उत्तर
Virat Kohli
| Edited By: | Updated on: Jun 01, 2021 | 5:07 PM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सध्या जगातील अव्वल क्रमाकांचा फलंदाज असणारा विराट सध्या सोशल मीडियवर बराच सक्रिय आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला जाण्यापूर्वी विराट मुंबईत विलगीकरणात आहे. यावेळी तो आपल्या चाहत्यांशी इन्स्टाग्रामवरुन संवाद साधतो आहे. याचदरम्यान एका चाहत्याच्या ‘ट्रोलर्स आणि मीम्सना कसं उत्तर देतोस?’ या प्रश्नाला विराटने अगदी हटके उत्तर दिलं आहे. विराटने उत्तर म्हणून आपल्या इन्स्टा स्टोरीत एक फोटो शेअर केला. (Indian Cricket Team Captain Virat Kohli answer to trollers on Instagram)

Virat Kohli Celebration

ऑस्ट्रेलिया विरोधात शतक मारल्यानंतर विराट कोहली

हाच तो फोटो असून यातून विराट सांगू इच्छितो की, ‘मी ट्रोलर्सना उत्तर देत नाही, तर माझ्या बॅटमधून धावा करुन माझी बॅट त्यांना उत्तर देते.’ 

हा फोटो कधीचा?

विराटचा हा फोटो 2018-19 मधील ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातील आहे. विराटने पर्थ येथे ऑस्ट्रेलिया विरोधात दमदार शतक ठोकले होते. त्यावेळी कोहलीने आपल्या हटके अंदाजात शतक ठोकण्याचा आनंद व्यक्त केला होता. या कृतीतून त्याच्या खेळावर प्रश्न उपस्थित करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ, तेथील मीडिया आणि सर्वांनाच  त्याने चोख उत्तर दिलं होत.

इंग्लंडमध्येही विराटची बॅट तळपणार का?

सध्या खेळत असलेल्या फलंदाजात विराटच्याच नावावर सर्वाधिक शतकं आहेत. मात्र नोव्हेंबर 2019 पासून विराटने एकही शतक ठोकलेलं नाही. त्यामुळे विराटचे चाहते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात आणि इंग्लंड दौऱ्यावर विराटची बॅट चालूदे अशी प्रार्थना करत आहेत. तर नेमकी विराट कशी कामगिरी करतो हे पाहण औत्सुक्याच राहिल.

फॅन्सने विचारलं वामिका चेहरा कधी दाखवणार?

एका फॅन्सने विराटला खास प्रश्न विचारला ज्या उत्तराची सगळी जग वाट पाहत होतं. तुझ्या लेकीच्या नावाचा अर्थ काय आहे? ती आता कशी आहे? तिची एक झलक आम्हाला दाखवू शकशील का? असे एकापाठोपाठ एक तीन प्रश्न एका फॅन्सने विराटला विचारले. विराटने चाहत्याला प्रश्नाला अगदी दिलखुलास उत्तरं दिली. वामिका हे देवी दुर्गाचं दुसरं नाव आहे. आम्ही नवरा बायकोने ठरवलंय (विराट-अनुष्का) की आपल्या लेकीचा फोटो आपण सोशल मीडियावर टाकायचा नाही. जोपर्यंत तिला सोशल मीडिया म्हणजे काय? हे समजत नाही तोपर्यंत तिचा चेहरा, फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचा नाही. यासंदर्भात ती (वामिका) तिचा निर्णय घेईन, अशी विराट स्टाईल उत्तरं चाहत्याला मिळाली.

संबधित बातम्या :

Virat kohli : लेक वामिकाचा चेहरा कधी दाखवणार? फॅन्सच्या प्रश्नावर ‘विराट स्टाईल’ उत्तर!

तुझं आणि माहीचं नातं फक्त 2 शब्दात सांग, फॅन्सच्या प्रश्नावर विराटचं ‘हृदय’ जिंकणारं उत्तर!

Video : IPL मॅचेससाठी चहलची बायको युएईला जाण्यासाठी तयार, BCCI ने घोषणा करताच डान्सचा खास व्हिडीओ शेअर

(Indian Cricket Team Captain Virat Kohli answer to trollers on Instagram)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.