2021 पासून टीम इंडियात संधी नाही; अखेर मराठमोळ्या भारतीय क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती, पोस्टमध्ये लिहिलं…

Punam Raut Retirement: टीम इंडियाकडून संधी मिळाली नाही. अखेर भारतीय खेळाडून निवृत्ती स्वीकारली आहे. भारतीय खेळाडूचा मोठा निर्णय घेतला आहे.

2021 पासून टीम इंडियात संधी नाही; अखेर मराठमोळ्या भारतीय क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती, पोस्टमध्ये लिहिलं...
| Updated on: Oct 15, 2026 | 10:28 PM

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज पूनम राऊतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गुरुवारी पूनमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय अशा खेळाच्या तिन्ही प्रकारात खेळणारी ही भारतीय खेळाडू २०२१ पासून क्रिकेटपासून दूर होती. ती शेवटची ऑक्टोबर २०२१ मध्ये भारतीय संघाकडून खेळली होती.

पूनमने २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ती मुंबई संघाकडून खेळली. वयाच्या ३७ व्या वर्षी पूनमने आपल्या दशकाहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीचा समारोप केला. २०१७ च्या महिला विश्वचषक स्पर्धेत पूनमची कामगिरी प्रभावी होती. तिने या स्पर्धेत एकूण ३८१ धावा केल्या, ज्यात लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यातील ८६ धावांच्या खेळीचा समावेश होता.

Loading...

आपल्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये पूनमने लिहिले की, मुंबईच्या रस्त्यांपासून ते भारतीय जर्सी घालण्यापर्यंतचा हा प्रवास एका आशीर्वादापेक्षा कमी नाही. हा एक असा प्रवास आहे ज्यात अनेक त्याग, संघर्ष, अविस्मरणीय विजय आणि कठीण धडे होते. हे असे क्षण आहेत जे मी आयुष्यभर जपून ठेवीन. भारताचे प्रतिनिधित्व करणे हे केवळ एक स्वप्नपूर्ती नव्हतं. तर तो एक बहुमान होता, जो मी मोठ्या अभिमानाने मिरवला. माझ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीचा हा अध्याय संपवताना ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, मला पाठिंबा दिला आणि माझ्या या प्रवासाचा भाग होते, त्या सर्वांप्रति माझे मन कृतज्ञतेने भरून आले आहे.

पूनमने तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत चार कसोटी, ७३ एकदिवसीय आणि ३५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिने सात कसोटी डावांमध्ये २६४ धावा केल्या आहेत. तसेच, तिने ७३ एकदिवसीय डावांमध्ये २२९९ धावा केल्या आहेत. उर्वरित ३१ टी-२० आंतरराष्ट्रीय डावांमध्ये पूनमने ७१९ धावा केल्या आहेत. तरीही तिला संघात स्थान मिळत नव्हते. यामुळे अखेर पुनम राऊतने मोठा निर्णय घेतला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us