WTC Final मधील अष्टपैलू कामगिरीचं रवींद्र जाडेजाला रिटर्न गिफ्ट, ICC क्रमवारीत मुसंडी, जेसन होल्डरला टाकलं मागे

| Updated on: Jun 23, 2021 | 5:50 PM

जाडेजाने WTC Final च्या पहिल्या डावात भारताला एक यश मिळवून दिलं. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्यांच्याकडून बऱ्याच आशा संघाला आहेत.

WTC Final मधील अष्टपैलू कामगिरीचं रवींद्र जाडेजाला रिटर्न गिफ्ट, ICC क्रमवारीत मुसंडी, जेसन होल्डरला टाकलं मागे
रवींद्र जाडेजा
Follow us on

साऊदम्पटन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामना (WTC Final 2021) आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. आजच्या दिवशीचा खेळ विजेता ठरवणार असून सामन्याच्या रिझल्ट आधीच भारताच्या रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) यश मिळालं आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या कसोटी आयसीसी क्रमवारीत (ICC Test Rankings) जाडेजा अव्वल स्थानी पोहोचला आहे. वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला (Jason Holder) मागे टाकत जाडेजाने हे स्थान मिळवलं आहे. सामना सुरु होण्याआधी जाडेजाच्या जागी अतिरिक्त फास्टर बोलर खेळवायचा असा विचार संघ व्यवस्थापन करत होता. मात्र जाडेजाला खेळवण्याची रिस्क संघाने घेतली. जी यशस्वी देखील ठरली. जाडाजाने दिलासादायक कामगिरी करुन भारताला फायदा करुन दिला.

एकीकडे न्यूझीलंडच्या संघाने एकही स्पिनर खेळवला नाही. तर दुसरीकडे भारतीय संघाने रवीचंद्रन आश्विन आणि रवींद्र जाडेजा असे दोन्ही स्पीनर खेळवले. दोघांना जास्त गोलंदाजी मिळाली नसली तरी दोघांनी  महत्त्वाचे विकेट घेतले.  तसेच जाडेजाने फलंदाजी करतानाही चिवट खेळी करत 15 रन बनवले.

होल्डरला मागे टाकत गाठलं अव्वल स्थान

रवींद्र जाडेजाने दुसऱ्या स्थानावरुन पहिलं स्थान गाठलं आह. यामध्ये त्याच्या अप्रतिम कामगिरीसोबतच जेसन होल्डरच्या खराब कामगिरीचाही त्याला फायदा झाला. होल्डरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खास कामगिरी करु शकला नाही. होल्डरने संपूर्ण मालिकेत 34 रन आणि 6 विकेट्सच मिळवले. त्यामुळे जाडेजाने त्याला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं आहे.

हे ही वाचा :

WTC Final 2021 : बोलिंगसह बॅटचीही जादू, टीम साऊथीने सचिन तेंडुलकरपासून पॉन्टिगपर्यंत अनेकांना पछाडलं!

WTC Final : टॉवेल बांधून मैदानात उतरला मोहम्मद शमी, फोटो पाहून चाहते लोटपोट, म्हणाले सावरिया 2.0

WTC Final 2021 : फायनल सामना ड्रॉ झाला तर भारताला मोठं नुकसान, न्यूझीलंड फायद्यात!

(Indian Cricketer Ravindra Jadeja became rank 1 All Rounder In ICC Test Rankings with WTC Final great performance)