Cricket : रोहित-विराटचा पत्ता कट, बुमराह, पंड्या-सूर्यासह ‘या’ खेळाडूंना संधी, पाहा वरुण चक्रवर्थीची ड्रीम टीम

Rohit Sharma and Virat Kohli : रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही टी 20i आणि वनडे या दोन्ही फॉर्मेटमधून जवळपास एकाच वेळी निवृत्ती घेतली. त्यानंतर आता दोघेही फक्त वनडे क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहेत. मात्र या दरम्यान या दोघांना एका संघातून वगळण्यात आलं आहे.

Cricket : रोहित-विराटचा पत्ता कट, बुमराह, पंड्या-सूर्यासह या खेळाडूंना संधी, पाहा वरुण चक्रवर्थीची ड्रीम टीम
Rohit Sharma and Virat Kohli
Image Credit source: Surjeet Yadav
| Updated on: Jun 30, 2025 | 6:02 PM

टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तर भारतीय क्रिकेट संघाची अनुभवी जोडी रोहित शर्मा आणि विराट कोहली हे सध्या रिलॅक्स मोडवर आहेत. रोहित आणि विराट या दोघांनी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2024 विजयानंतर सर्वात छोट्या फॉर्मटमधून निवृत्ती घेतली. तर काही आठवड्यांपूर्वी दोघांनीही काही दिवसांच्या अंतराने कसोटी क्रिकेटलाही अलविदा केला. त्यामुळे आता हे दोघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त वनडेतच खेळताना दिसणार आहेत. हे दोघेही वनडे क्रिकेटमध्ये किती वर्ष खेळतील? असा प्रश्नही उपस्थित केला जातो. या दरम्यान मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने टीम जाहीर केली आहे. वरुणने या टीममध्ये रोहित आणि विराट या दोघांचा समावेश केलेला नाही.

रोहित विराटला नो एन्ट्री कशामुळे?

वरुणने जाहीर केलेला संघ हा कोणत्या मालिकेसाठी नाही. वरुणची ही ड्रीम टीम आहे.वरुणने त्याच्या या संघात 11 खेळाडूंचा समावेश केला आहे. मात्र या 11 खेळाडूंमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना संधी देण्यात आलेली नाही. वरुणने या संघात त्याच खेळाडूंना संधी दिली आहे ज्यांच्यासोबत तो खेळला आहे. मात्र वरुण रोहित आणि विराटसोबतही खेळला आहे. मात्र त्यानंतरही वरुणने या 2 भारतीय अनुभवी खेळाडूंना संधी दिलेली नाही.

फक्त 3 भारतीयांची निवड

वरुणच्या या ड्रीम टीममध्ये 11 पैकी फक्त 3 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. वरुणच्या या संघात हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह या 3 भारतीयांचा समावेश आहे. वरुण विदेशी खेळाडूंसोबतही खेळला आहे. त्यामुळे वरुणच्या या ड्रीम टीममध्ये विदेशी खेळाडूही आहेत.

6 देशांमधील 8 खेळाडूंना संधी

वरुण 6 देशांमधील 8 खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. वरुणने ड्रीम टीममध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, श्रीलंका, वेस्टइंडिज आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना स्थान दिलं आहे. वरुणने विंडीजच्या सर्वाधिक 3 खेळाडूंना संधी दिलीय. यामध्ये निकोलस पूरन, आंद्रे रसेल आणि सुनील नारायण यांना संधी दिलीय. तर जोस बटलर (इंग्लंड), ट्रेव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), राशिद खान (अफगाणिस्तान), मथीशा पथिराणा (श्रीलंका) आणि हेन्रिक क्लासेन (दक्षिण आफ्रिका) या खेळाडूंचाही समावेश आहे.

वरुणने जोस बटलर याला कर्णधार केलं आहे. जोस बटलर आणि ट्रेव्हिस हेड या दोघांना ओपनर म्हणून संधी दिली आहे. सूर्यकुमार यादव याला तिसऱ्या स्थानासाठी पसंती दिलीय. मधल्या फळीची जबाबदारी हेन्रिक क्लासेन, हार्दिक पंड्या, निकोलस पूरन आणि आंद्रे रसेल यांच्यावर आहे. तर सुनील नारायण, राशिद खान, जसप्रीत बुमराह आणि मथिशा पथिराणा या चौघांना गोलंदाज म्हणून संधी दिली आहे.