AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : टीम इंडिया एक दोन नाही तर 28 चुका पडणार महागात, श्रीलंका दौऱ्यात तसंच झालं तर…

भारतीय संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर आहे. ही मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. पण मागच्या 28 चुका पाहता क्रीडाप्रेमींचं टेन्शन वाढलं आहे.

IND vs SL : टीम इंडिया एक दोन नाही तर 28 चुका पडणार महागात, श्रीलंका दौऱ्यात तसंच झालं तर...
IND vs SL : टीम इंडिया एक दोन नाही तर 28 चुका पडणार महागात, श्रीलंका दौऱ्यात तसंच झालं तर...Image Credit source: Getty Images
| Updated on: Aug 06, 2026 | 3:17 PM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना 15 ऑगस्टपासून आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडिया कसून सराव करत आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरी गाठायची तर ही मालिका 2-0 ने जिंकणं भाग आहे. पण मागच्या तीन महिन्यातील चुका पाहता क्रीडाप्रेमींचं टेन्शन वाढलं आहे. यामुळे श्रीलंका कसोटी मालिका कठीण जाण्याची शक्यता आहे. या चुका दुसऱ्या तिसऱ्या काही नसून गचाळ क्षेत्ररक्षणासंदर्भातल्या आहे. भारताने मागच्या तीन महिन्यात झेल सोडण्याचा नकोसा विक्रम केला आहे. कॅचेस ड्रॉप लॉसेस मॅच या उक्तीप्रमाणे भारताला मागच्या काही मालिकांमध्ये फटका बसला आहे. मागच्या सहा सामन्यांपासून सलग चुका करत आहे. याचा फटका टीम इंडियाला पराभवातून चुकवावा लागू शकतो.

टीम इंडियाचा झेल सोडण्याची जणू सवयच..

टीम इंडियाने गेल्या काही कसोटी मालिकांमध्ये गचाळ क्षेत्ररक्षणाचं भव्य प्रदर्शन मांडलं आहे. मागच्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता असंच म्हणावं लागेल. जून महिन्यापासून भारताने 6 मालिका खेळल्या आणि यात 28 झेल सोडले आहेत. यावरून टीम इंडियाचं क्षेत्ररक्षणात मन रमत नसल्याचं दिसून येत आहे. अफगाणिस्तान कसोटी सामन्यात 4 झेल, अफगाणिस्तान वनडे मालिकेत 1 झेल, आयर्लंड टी20 मालिकेत 6 झेल, इंग्लंड टी20 मालिकेत 5 झेल, इंग्लंड वनडे मालिकेत 2 झेल आणि झिम्बाब्वे टी20 मालिकेत 10 झेल सोडले आहेत.

टीम इंडियाचं फिटनेस काय कामाचं?

झिम्बाब्वेमध्ये टीम इंडियाची झेल पकडण्याची क्षमता टक्केवारीत फक्त 64.2 टक्के आहे. टीम इंडियाने 18 झेल पकडले, पण 10 झेल सोडले त्याचं काय? दुसरीकडे, झिम्बाब्वेने 12 झेल पकडले आणि एकच सोडला. म्हणजे भारतापेक्षा क्षेत्ररक्षणात झिम्बाब्वे सरस आहे. मग प्रश्न असा पडतो की टीम इंडिया फिटनेसवर इतकं लक्ष केंद्रित करते मग झेल का सुटतात? झेल सोडल्यामुळे भारताने आयर्लंड टी20 मालिका गमावली. झेल सोडण्याचा फटका इंग्लंड वनडे आणि टी20 मालिकेतही बसला. आता श्रीलंकेत असं काही घडलं तर जिंकणं कठीण होईल.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...